
२२५ हून अधिक रायडर्सचा सहभाग
या स्पर्धेत यजमान पुण्यासह कोल्हापूर, नाशिक, सातारा, अहिल्यानगर आणि गडहिंग्लज येथील नामांकित रायडर्सनी भाग घेतला होता. स्पर्धेमध्ये नोव्हिस क्लास, मॉडिफाइड बाइक्स (१२५ सीसी, २५० सीसी, ३५० सीसी), महिला गट आणि स्कूटर गट अशा विविध श्रेणींमध्ये चुरशीच्या फेऱ्या रंगल्या.
Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
मान्यवरांच्या हस्ते ‘फ्लॅग ऑफ’
पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड यांनी विविध गटांतील शर्यतींना हिरवा झेंडा दाखवून (फ्लॅग ऑफ) स्पर्धेचा शुभारंभ केला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष मनोज भोरे तसेच पुणे फेस्टिव्हलचे क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले उपस्थित होते.
१० वर्षांच्या चिमुकल्यांचे लक्षवेधी प्रात्यक्षिक
या स्पर्धेला ‘फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’ची (FMSCI) अधिकृत मान्यता लाभली होती. ‘एक्स्ट्रीम रेसिंग व मोटार स्पोर्ट्स’च्या संस्थापक शीतल राठोड यांनी स्पर्धेचे संयोजन केले. दरम्यान, पुण्यातील रिदा सय्यद, झायडेन चिंधी आणि इव्हान चिंधी या अवघ्या १० वर्षांच्या चिमुकल्या रायडर्सनी दुचाकी वाहनांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक (डेमॉन्स्ट्रेशन) सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तरुणाईच्या प्रचंड प्रतिसादात आणि जल्लोषात ही स्पर्धा पार पडली.
कलादालनात कलाविष्कारांची मेजवानी
बालगंधर्व कलादालनातही विविध कलाविष्कारांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १७ सप्टेंबरला ५० हून अधिक सुलेखनकारांच्या २०० हून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. १९ व २० सप्टेंबरला पत्रकार छायाचित्रकारांनी वर्षभरात टिपलेल्या सुमारे २५० छायाचित्रांचे प्रदर्शन पाहता येणार आहे. २१ व २२ सप्टेंबरला ८० हून अधिक व्यंगचित्रकारांची २०० पेक्षा अधिक व्यंगचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.
मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला
मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर झालेल्या ‘एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज’ २डब्ल्यु-२०२६ स्पर्धेत पुण्याच्या १९ वर्षीय आणि पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग संघाच्या सार्थक चव्हाण याने ‘सुपर स्पोर्ट ३०१-४००सीसी ओपन’ या प्रमुख गटात सलग दोन विजय मिळवून दुहेरी मुकूट पटकावला.