Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess Championship: बुद्धिबळाच्या पटावर डावपेचांचा धडाका! ३८७ खेळाडूंचा बुद्धीसंग्राम; सहा गटांत आघाडीसाठी काट्याची टक्कर

SBI Life Maharashtra State School Chess Championship: एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३८७ खेळाडूंमध्ये आघाडीसाठी चुरस रंगली आहे. ९ वर्षांखालील खुल्या गटात चार खेळाडू प्रत्येकी चार विजयांसह संयुक्त आघाडीवर आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 14, 2026 | 08:25 PM
Maharashtra State School Chess Championship

Maharashtra State School Chess Championship

Follow Us
Follow Us:
  • राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेत रंगत वाढली
  • ३८७ बुद्धिबळपटूंमध्ये काट्याची टक्कर
  • १३ वर्षांखालील मुलींच्या गटात सहा जणी आघाडीवर
मुंबई : एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात चौथ्या फेरीनंतर आघाडीसाठी अक्षरशः बुद्धीसंग्राम सुरू झाले आहे. दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत युवा बुद्धिबळपटूंनी आपल्या चालींच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवे आव्हान दिले. त्यामुळे आघाडी राखण्यासाठी जोरदार चुरस रंगली आहे.

 

इंडियन चेस स्कूलच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय स्पर्धेत ९, १३ आणि १७ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या अशा सहा फिडे मानांकित गटांत तब्बल ३८७ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत आहेत. चार फेऱ्यांनंतर काही गटांत संयुक्त आघाडीचे चित्र निर्माण झाले असून, विशेषतः १३ वर्षांखालील मुलींच्या गटातील सहा खेळाडूंची बरोबरी स्पर्धेतील उत्कंठा अधिकच वाढवणारी ठरली आहे.

Virat Kohli: विराट कोहली इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर! ‘इतक्या’ धावा करताच मोडणार मास्टर ब्लास्टरचा मोठा रेकॉर्ड

९ वर्षांखालील खुल्या गटात चौघांचा विजयी चौकार

या गटात चार खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना एकही संधी न देता सलग चार विजयांची नोंद केली आहे. विबग्योर राइज, मालाड (पश्चिम)चा एसीएम अगस्त्य पटवा (१५२७), जमनाबाई नरसी स्कूल, जेव्हीपीडीचा वीर शाह (१५०१), सिम्बायोसिस प्रायमरी अँड सेकंडरी स्कूलचा एएफएम अद्विक नवल (१४७६) आणि संजीवनी वर्ल्ड स्कूल, दहिसरचा अथर्व मुळीक (१४८३) यांनी प्रत्येकी चार गुणांची कमाई करत संयुक्त आघाडीवर झेप घेतली आहे. अवलॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूलचा एएफएम शिवांश कारिया (१५०६), पोदार इंटरनॅशनल स्कूलचा ईशान अग्निहोत्री (१६१८) आणि मॅट्रिक्स अकॅडमी स्कूलचा मानांकन नसलेला वीरेन बोरिचा हे प्रत्येकी साडेतीन गुणांसह आघाडीच्या चौकडीचा पाठलाग करत आहेत.

चैतन्या-मनवा आघाडीवर

मुलींच्या या गटात दादरच्या जे. बी. वाच्छा हायस्कूलची मानांकन नसलेली चैतन्या नागराळे आणि ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, कांदिवलीची एएफएम मनवा पारकर (१४१५) यांनी प्रत्येकी चार गुण मिळवत संयुक्त आघाडी पटकावली आहे. त्यांना कनिष्का गाला (१४७९), लावण्या सिंग (१४४८), इशी सिंग (१५३८) आणि लिया कृष्णन (१५५८) या प्रत्येकी साडेतीन गुणांसह कडवी टक्कर देत आहेत. त्यामुळे या गटातील आघाडीची लढाई अधिकच रंगतदार झाली आहे.

१३ वर्षांखालील खुल्या गटात तिघांची विजयी घोडदौड

या गटात ओम रामगुडे (१९०६), विहान अग्रवाल (१८५८) आणि एआयएम कश्यप खाखरिया (१७८९) यांनी आपापल्या चारही लढती जिंकत प्रत्येकी चार गुणांची कमाई केली आहे. लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल, वाघोलीचा ओम, नारायणा ऑलिम्पियाड स्कूलचा विहान आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल, सांगलीचा कश्यप यांच्यात संयुक्त आघाडीसाठी चुरशीची लढत सुरू आहे.

१३ वर्षांखालील मुलींच्या गटात सहा जणींचा आघाडीवर कब्जा

स्पर्धेतील सर्वाधिक चुरस या गटात पाहायला मिळत आहे. तब्बल सहा खेळाडूंनी प्रत्येकी साडेतीन गुण मिळवत संयुक्त आघाडीवर स्थान मिळवले आहे. पहिल्या टप्प्यात ११ वर्षांखालील मुलींचे विजेतेपद पटकावणारी ग्रीनलॉन्स हायस्कूलची अग्रमानांकित त्वेषा जैन (१६९७), डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाची प्रणिता भावा (१६५५), सी. एन. एम. स्कूल, विलेपार्लेची महुआ देशपांडे (१५२७), अवलॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूलची तिस्या पट्ट (१५२४), हिरानंदानी फाउंडेशन स्कूलची निश्का अग्रवाल (१५६२) आणि आय.ई.एस. चंद्रकांत पाटकर विद्यालयाची मानांकन नसलेली त्रिशा पांचाळ यांनी आघाडीच्या शर्यतीत एकत्रित मुसंडी मारली आहे.

हृदय मनियारची एकहाती सत्ता

या गटात अग्रमानांकित एआयएम हृदय मनियार (१९१०) याने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत सलग चार विजयांची नोंद केली आहे. चार गुणांसह त्याने एकट्याने आघाडीवर कब्जा केला आहे. मानांकन नसलेला अर्ह वाघमारे, युवराज सिंग (१६९०) आणि शौर्य मोदी (१६२६) हे प्रत्येकी साडेतीन गुणांसह त्याच्या पाठलागावर आहेत.

१७ वर्षांखालील मुलींत दृष्या नाईक अपराजित

मुलींच्या या गटात अग्रमानांकित दृष्या नाईक (१७१३) हिनेही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. सलग चार विजयांसह चार गुणांची कमाई करत तिने एकहाती आघाडी मिळवली आहे. श्रेया जोशी (१५२५), सायना नागरकट्टे (१४१९) आणि इक्षा सोनी (१५२८) यांनी प्रत्येकी तीन गुण मिळवत तिच्या आघाडीला आव्हान देण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.

चार फेऱ्यांनंतर सहाही गटांतील आघाडीचे चित्र स्पष्ट होत असले, तरी अंतिम विजेतेपदाची लढाई अद्याप खुली आहे. आगामी फेऱ्यांत कोण बाजी मारणार आणि कोणाचे आव्हान संपुष्टात येणार, याकडे बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागले आहे.

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक लढतीआधी भारताला धक्का! ‘या’ स्टार खेळाडूची अचानक एक्झिट; कोण घेणार जागा?

Web Title: Sbi life maharashtra state school chess championship 387 players participated pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • Chess Championship
  • Rapid Chess Tournament
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket News: पुण्यात क्रिकेटचा थरार! मेहक मुल्ला अन् आर्या चिखलीकर यांची तूफान खेळी; पहिल्याच दिवशी…
1

Cricket News: पुण्यात क्रिकेटचा थरार! मेहक मुल्ला अन् आर्या चिखलीकर यांची तूफान खेळी; पहिल्याच दिवशी…

हा काय ऐकणार नाही! Vaibhav Suryavanshi ने नावावर केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड; आता थेट बिहारच्या…
2

हा काय ऐकणार नाही! Vaibhav Suryavanshi ने नावावर केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड; आता थेट बिहारच्या…

CBSE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ओडिशा AM/NS इंडियाचा डंका! ४ सुवर्णांसह ११ पदकांची कमाई
3

CBSE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ओडिशा AM/NS इंडियाचा डंका! ४ सुवर्णांसह ११ पदकांची कमाई

Chess Championship : बुद्धिबळाच्या पटावर मानांकितांचा झंझावात, 387 युवा खेळाडूंचा राज्य शालेय अजिंक्यपदासाठी संघर्ष
4

Chess Championship : बुद्धिबळाच्या पटावर मानांकितांचा झंझावात, 387 युवा खेळाडूंचा राज्य शालेय अजिंक्यपदासाठी संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.