
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Indian Premier League 2026, Gujarat Titans Coach : आयपीएल 2026 च्या नव्या सिझनसाठी क्रिकेट चाहते फारच उत्सुक आहेत. सोशल मिडियावर संघाची आणि नव्या सिझनची सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळत आहे. गुजरात टायटन्स सध्या १९ व्या हंगामापूर्वी त्यांच्या कोचिंग स्टाफवर काम करत आहे. फ्रँचायझीने अलीकडेच ऑस्ट्रेलियन दिग्गज मॅथ्यू हेडन यांना त्यांचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्यानंतर, गौतम गंभीरचा जवळचा सहकारी देखील सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संघात सामील झाला आहे.
या अनुभवी खेळाडूने कोलकाता नाईट रायडर्सना जेतेपद जिंकण्यासही मदत केली. यासह, गुजरात टायटन्सचा कोचिंग स्टाफ आता पूर्ण झाला आहे. संघ सध्या त्याच्या दुसऱ्या ट्रॉफीची वाट पाहत आहे. गुजरातच्या संघाने त्याच्या पहिल्या सिझनमध्ये ट्राॅफी नावावर केली होती त्यानंतर संघाने दुसऱ्या सिझनमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये देखील प्रवेश केला होता. आता हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये गेल्यानंतर शुभमन गिल संघाची कमान सांभाळत आहे.
Powerhouse. Legend. Now our Batting Coach 💪 Saying ‘𝗛𝗮𝘆-𝗗𝗼𝘀t’ to @HaydosTweets 👋 pic.twitter.com/J3eE59AzM1 — Gujarat Titans (@gujarat_titans) March 10, 2026
गुजरात टायटन्सने आता आयपीएल २०२६ साठी विजय दहियाला त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. दहियाला प्रशिक्षणाचा व्यापक अनुभव आहे, त्याने टीम इंडियासाठी दोन कसोटी आणि १९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. प्रशिक्षक म्हणून, दहियाने २००७-०८ मध्ये दिल्ली संघाचे जेतेपद मिळवून दिले. दहिया पहिल्यांदा २००९ मध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केकेआरमध्ये सामील झाला.
त्यानंतर त्याने २०२३ आणि २०१४ मध्ये संघासोबत काम केले. २०१४ मध्ये केकेआरनेही चॅम्पियनशिप जिंकली. तेव्हापासून गौतम गंभीर त्याला एक चांगला प्रशिक्षक मानत होता. म्हणूनच जेव्हा तो लखनौ सुपर जायंट्समध्ये सामील झाला तेव्हा त्याने विजय दहियाला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून जोडले.
गुजरात टायटन्सच्या कोचिंग स्टाफबद्दल बोलायचे झाले तर, आशिष नेहरा पहिल्या हंगामापासून मुख्य प्रशिक्षक आहेत. मॅथ्यू हेडन आधीच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. नरेंद्र नेगी हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत आणि नईम अमीन हे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. विक्रम सोलंकी हे पहिल्या हंगामापासून क्रिकेट संचालक आहेत. कर्णधार शुभमन गिल या कोचिंग स्टाफसह संघाला दुसरी ट्रॉफी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील.