Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

Cricket: दुसऱ्या सामन्यात अथर्व बारटक्केच्या आक्रमक शतकाच्या जोरावर टायटन बुल्स्‌ संघाने गेम स्विंगर्सविरुद्ध एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम खेळताना टायटन बुल्स्‌ने २० षटकांत ७ गडी गमावून २१९ धावांचा डोंगर उभारला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2026 | 03:41 PM
स्पार्टन मान्सुन लीग

स्पार्टन मान्सुन लीग

Follow Us
Follow Us:
  • स्पार्टन मान्सुन लीगमध्ये अनिकेत कुंभार व अथर्व बारटक्के यांची धडाकेबाज शतके
  • टायटन बुल्स्‌चा एका धावेने थरारक विजय
  • सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर पार पडली स्पर्धा 
पुणे/Cricket: स्पार्टन क्रिकेट क्लब, पुणे यांच्या वतीने आयोजित सहाव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत राकेश ताकवले (आरटी) ग्रुप आणि टायटन बुल्स्‌ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत धडाकेबाज विजय नोंदवला. सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या सामन्यात अनिकेत कुंभारच्या वादळी शतकाच्या जोरावर आरटी ग्रुपने सेरेन स्ट्रायकर्स संघावर सात गडी राखून मात केली आणि स्पर्धेतील सलग पाचवा विजय नोंदविला.

प्रथम फलंदाजी करताना सेरेन स्ट्रायकर्सचा संघ १६.१ षटकांत १६८ धावांवर गारद झाला. त्यांच्याकडून जय कुमारने अवघ्या १८ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ५७ धावांची आक्रमक खेळी केली. आरटी संघाकडून प्रफुल्ल मानकर आणि रणजीत जगताप यांनी अचूक गोलंदाजी करत प्रत्येकी ३ गडी बाद केले. १६९ धावांचे लक्ष्य आरटी ग्रुपने अवघ्या १३.२ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १७० धावा करून सहज पार केले. अनिकेत कुंभारने तुफानी फलंदाजी करत ४४ चेंडूंत १३ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १११ धावांची खेळी केली. त्याला आदित्य कदमने नाबाद २४ धावा करत उत्तम साथ दिली.

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

टायटन बुल्स्‌चा एका धावेने सनसनाटी विजय

दुसऱ्या सामन्यात अथर्व बारटक्केच्या आक्रमक शतकाच्या जोरावर टायटन बुल्स्‌ संघाने गेम स्विंगर्सविरुद्ध एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम खेळताना टायटन बुल्स्‌ने २० षटकांत ७ गडी गमावून २१९ धावांचा डोंगर उभारला. अथर्व बारटक्केने ४४ चेंडूंत १२ चौकार व ६ षटकारांसह १०३ धावांची खेळी रचली. त्याला आशिष झागता (२९ धावा) व अमोल कदम (२४ धावा) यांनी उपयुक्त योगदान दिले.

टायटन्सची दमदार गोलंदाजी

२२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गेम स्विंगर्सचा डाव २० षटकांत ६ गडी बाद २१८ धावांवर रोखला गेला. हृषीकेश मत्स्येने ६१ धावा (३५ चेंडू, १० चौकार, १ षटकार), ओजस साठेने ४० धावा, प्रतिक बक्शीने ३८ धावा आणि स्वप्निल इच्चेने २७ धावा करून कडवी झुंज दिली; मात्र संघाला विजयाने एका धावेने हुलकावणी दिली. टायटन्स्‌कडून सुनिल यादवने ३, तर संतोषकुमार सांगळेने २ गडी बाद केले.

Asian Games: भारताच्या वाघिणींसमोर श्रीलंका उद्ध्वस्त; 147 रन्सने केला पराभव अन् जिंकले Gold Medal

Web Title: Spartan monsoon league aniket kumbhar century and titan bulls win the match pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • cricket
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ओतूरच्या ‘चैतन्य’ची बाजी, ६ खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड; चाकण येथे रंगणार स्पर्धा
1

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ओतूरच्या ‘चैतन्य’ची बाजी, ६ खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड; चाकण येथे रंगणार स्पर्धा

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
2

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
3

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
4

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.