फोटो सौजन्य - Gujarat Titans/Mumbai Indians
मुंबई इंडीयन्स विरुध्द गुजरात टायटन्स टॅास अपडेट : मुंबई इंडीयन्स विरुध्द गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात दोन्ही संघासाठी गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानासाठी लढाई होणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ या सिझनमध्ये दमदार फॅार्ममध्ये आहेत. आजच्या सामन्यात दोन्ही संघाची नजर गुणतालिकेच्या पहिल्या स्थानावर असणार आहे. शुभमन गील आणि साई सुदर्शन यांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.
आजच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. तर गुजरात टायटन्सच्या संघाने आजच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर आज अर्शद खान याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आज कोणाला स्थान दिले जाणार हे पाहणे मनोरंजक ठरेल. साई सुदर्शन ऑरेंज कॅपचा पक्का दावेदार आहे त्याचबरोबर या दोघांच्या जोडीने कमाल केली आहे त्यामुळे आज हे दोघे कशी कामगिरी करतात आणि आज संघाला कशी सुरुवात करून देतील हे पाहणे महत्वाचे ठरेल. जोस बटलर देखील फॉर्ममध्ये आहे त्याने देखील संघासाठी मोठी खेळी खेळल्या आहेत.
🚨 Toss 🚨@gujarat_titans won the toss and elected to field against @mipaltan
Updates ▶ https://t.co/DdKG6Zn78k #TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/rnOezltlvv
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2025
गुणतालिकेबद्दल सांगायचे झाले तर गुजरात टायटन्सच्या संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचे आतापर्यत १० सामन्यांमध्ये १४ गुण आहेत आजच्या सामन्यात विजय मिळवण्यास संघ प्लेऑफच्या आणखी जवळ जाईल आणि संघाचे १६ गुण होतील. मुंबई इंडियन्सचा संघ मागील सलग ६ विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. संघाने या सीझनमध्ये कमालीचा कमबॅक केला आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने विजय मिळवण्यास टीम सलग सातवा सामना नावावर करेल आणि पहिल्या स्थानावर विराजमान होईल सध्या संघाचे १४ गुण आहेत.
पाकिस्तानचा माजी खेळाडू आता इंग्लडच्या जर्सीत दिसणार? भारताविरुद्ध मालिकेत खेळणार का…
शुभमन गील (कर्णधार), साई सुदर्शन, जॅास बटलर (विकेटकिपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, साई किशोर, अरशद खान, जेराल्ड कोट्जिया, मोहम्मद सिराज, प्रसिध्द कृष्णा
इम्पॅक्ट प्लेयर – शरफेन रदरफर्ड, वॅाशिंग्टन सुंदर, अनुज रावत, महिपाल लोमरोर, दशुन शनाका
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, रायन रिकल्टन(विकेटकिपर), सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, कॅार्बिन बॅाश, दीपक चाहर, ट्रेंट बॅाल्ट, जसप्रीत बुमराह
इम्पॅक्ट प्लेयर – कर्ण शर्मा, रीस टॅाप्ली, रॅाबिन मिन्ज, राज अंगद बावा, अश्वनी कुमार