फोटो सौजन्य - X
आयपीएलच्या या 18 व्या सिझनचे आता काही सामनेच शिल्लक राहिले आहेत, त्यानंतर भारताचा संघ इंग्लड दौऱ्यावर असणार आहे. आयपीएल 2025 चा फायनलचा सामना 25 मे रोजी खेळवला जाणार आहे, त्यानंतर भारताचा संघ इंग्लडला रवाना होणार आहे. २० जूनपासून सुरू होणाऱ्या मालिकेत टीम इंडिया ५ कसोटी सामने खेळताना दिसणार आहे. तथापि, भारतीय चाहत्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इंग्लंडसाठी टीम इंडियाची निवड. म्हंटले जात होते की या मालिकेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.
या दौऱ्यातच, टीम इंडियाचा सामना एका ‘माजी’ पाकिस्तानी क्रिकेटपटूशी होऊ शकतो जो सध्या इंग्लंडच्या स्थानिक म्हणजेच काउंटी क्रिकेटमध्ये स्वत: चे वर्चस्व निर्माण करत आहे. पाकिस्तानी वंशाचा इंग्लिश क्रिकेटपटू जफर गोहर हे नाव भारतीय चाहत्यांसाठी नवीन असू शकते, परंतु काउंटी क्रिकेटमध्ये त्याच्या फिरकीची सध्या खूप चर्चा सुरू आहे. एकेकाळी पाकिस्तानसाठी कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणारा जफर आता इंग्रजी नागरिकत्व घेत आहे आणि ‘स्थानिक’ खेळाडू म्हणून देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. आता चर्चा अशी आहे की इंग्लंडचे निवड समिती त्याला भारताविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत संधी देणार का?
२०१५ मध्ये लेग स्पिनर यासिर शाह जखमी झाल्यानंतर जफर गोहरला अचानक पाकिस्तानच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले होते, परंतु उड्डाण चुकवल्यामुळे ही संधी त्याच्या हातून निसटली. नंतर, त्याला पाकिस्तान संघाकडून आणखी दोन वेळा खेळण्याची संधी मिळाली, २०१५ मध्ये एकदिवसीय संघात आणि २०२१ मध्ये कसोटी सामन्यात. पण सातत्यपूर्ण संधी न मिळाल्याने तो खूप निराश झाला. २०२२ मध्ये, त्याने इंग्लंडच्या ग्लॉस्टरशायर काउंटी संघासाठी चांगली कामगिरी केली, त्याने हंगामात ४७ विकेट्स घेतल्या आणि ५०० धावा केल्या, परंतु तरीही पाकिस्तान निवडकर्त्यांनी त्याला दुर्लक्षित केले.
Zafar Gohar, a left-arm spinner, could be the next player to represent another country if he manages to play for England.
Read more: https://t.co/Mz1lphmd6V#TheCurrent #ZafarGohar pic.twitter.com/NXBcZeS90M
— The Current (@TheCurrentPK) May 6, 2025
जफर आता इंग्लंडचा नागरिक झाला आहे. याशिवाय, झफरने २०२५ काउंटी हंगामातील पहिल्या ४ सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या आहेत आणि सध्या तो स्पर्धेतील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज आहे. यामुळेच इंग्लंडचे निवडकर्ते त्याच्या दाव्याला खूप गांभीर्याने घेत आहेत. इंग्लंडमध्ये विकेट घेण्यासाठी फिरकीपटूंना खूप मेहनत घ्यावी लागते असे म्हटले जाते पण जफरने ते चुकीचे सिद्ध केले आहे.
जफरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाकिस्तानकडून १ कसोटी आणि १ एकदिवसीय सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने एकदिवसीय स्वरूपात फक्त २ विकेट्स घेतल्या आहेत. जर जफरला इंग्लंडकडून कसोटी खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने भारताविरुद्ध विकेट घेतली, तर त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील ही त्याची पहिलीच विकेट असेल. तथापि, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, झफरने ८९ सामन्यांमध्ये ८९ विकेट्स घेतल्या आहेत ज्यात ७/७९ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.