MI vs GT: 'Hitman's' car is good! Rohit Sharma created history in IPL playoffs; broke his own record..
MI vs GT : आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. मुल्लानपूर येथे झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माकया अर्धशतकाच्या जोरावर संघाने २२८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युउत्तरात गुजरात टायटन्स २०८ धावा करू शकला. परिणामी गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला आणि गिलसेनेला स्पर्धेतून बाहेर लागले. या सामन्यात मुंबईच्या रोहित शर्माने एक इतिहास रचला आहे.
रोहित शर्माने आयपीएल प्लेऑफच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला आहे. २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले होते. त्याच वेळी, आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात देखील त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध अर्धशतक केले आहे. त्याने ५० चेंडूत ८१ धावा केल्या आहेत. यासह रोहितने आयपीएल २०२० मध्ये बनवलेला आपलाच विक्रम मोडला आहे.
हेही वाचा : ENG vs WI : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ब्रिटिशांचा ४०० धावांचा डोंगर, इंग्लंडकडून विंडीजचा २३८ धावांनी पराभव…
रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध ५० चेंडूंचा सामना करत ८१ धावा केल्या. आयपीएल प्लेऑफमधील ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. याआधी आयपीएल २०२० मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्लेऑफ सामन्यात ६८ धावांची खेळी केली होती. त्यानुसार रोहितने आयपीएल प्लेऑफमध्ये स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे.
३० मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने गुजरातचा २० धावांनी पराभव केला. या पराभवाने गुजरात टायटन्सचे या स्पर्धेतील प्रवासाचा शेवट झाला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २२८ धावा केल्या. यामध्ये रोहित शर्माने ५० चेंडूत ८१ धावा केल्या. तर जॉनी बेअरस्टोने २२ चेंडूत ४७ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने २० चेंडूत ३३ धावा करून महत्वाची भूमिका बजावली.
प्रत्युउत्तरात गुजरातचा संघ २०८ धावा करू शकला. गुजरातकडून सलामीवीर साई सुदर्शनने ४९ चेंडूचा सामना करत ८० धावा केल्या, तसेच वॉशिंग्टन सुंदरने देखील २४ चेंडूत ४८ धावा केल्या परंतु ही दोघे संघाला विजयी करू शकले नाहीत. ट्रेंट बोल्टने २, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन. मिशेल सँटनर आणि अश्विनी कुमार यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली. मुंबई आता पंजाबसोबत भिडणार आहे.
हेही वाचा : MI vs GT : गुजरातला एक चुक पडली महागात! MI लढणार PBKS शी, मुंबई इंडियन्सने 20 धावांनी केले पराभूत
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिशेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन.
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.