फोटो सौजन्य : IndianPremierLeague
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचा अहवाल : 30 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघाने दमदार सुरुवात करत रोहित शर्माने या सामन्यात कमालीची खेळी खेळली आणि गुजरात टायटन्समोर मोठी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे आजचे लक्ष्य पुर्ण करण्यात गुजरातचा संघ अपयशी ठरला. या सामन्यात गुजरातच्या संघाला 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
या पराभवासह गुजरात टायटन्सचा संघ स्पर्धेमधून बाहेर झाला आहे, तर मुंबई इंडियन्सचा संघ हा पंंजाब किंग्सविरुद्ध क्वालिफायर 2 चा सामना खेळणार आहे. गुजरात टायटन्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर संघाचा कर्णधार शुभमन गिल याचा विकेट लवकर गमवला आणि संघाला मोठा धक्का बसला. शुभमन गिल याने आजच्या सामन्यात चाहत्यांना निराश केले त्याने २ चेंडू खेळले आणि विकेट गमावला. कुशल मेंडिस याने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडी मारली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याने आजच्या सामन्यात त्याने दहा चेंडूंमध्ये वीस धावा केला यामध्ये त्यांनी दोन षटकार आणि एक चौकार मारला.
गुजरात टायटनच्या संघासाठी आज वॉशिंग्टन सुंदर हा ट्रम्प कार्ड ठरला. त्याने संघासाठी कमालीची कामगिरी केली पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. साई सुदर्शनने आजच्या सामन्यात गुजरात टायटनच्या संघासाठी कमालीची खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरला. त्याने 49 चेंडू मध्ये 80 धावा केल्या, यामध्ये त्याने एक षटकार आणि दहा चौकार मारले.
Next stop: Qualifier 2️⃣ 😍@mipaltan are all set to meet the @PunjabKingsIPL for a ticket to glory 🎟
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph#TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/vK0oAjcG5s
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
ट्रेंट बोल्ट याने आजच्या सामन्यात संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, मिचेल सँटनर, अश्वनी कुमार यांनी प्रत्येकी एक एक विकेट संघाला मिळवून दिला. जसप्रीत बुमराह याने वॉशिंग्टन सुंदर याला बाद केले आणि सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूने वळवला. त्याचबरोबर ग्लीसन याने साई सुदर्शन याला स्टॅम्प आऊट केले हा देखील सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.