फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
आयपीएल २०२५ चा हा १८ वा सिझन फारच रोमांचक होत चालला आहे. आयपीएल २०२५ चा ९वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२५ मध्ये पहिला सामना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणार आहे तर गुजरात टायटन्स शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळेल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला आहे. गुजरातचा पंजाब किंग्जकडून पराभव झाला, तर मुंबईचा चेन्नईकडून पराभव झाला. दोन्ही संघांकडे अनेक उत्तम खेळाडू आहेत, पण मुंबईकडे एक खेळाडू आहे जो या सामन्यात गुजरातवर मात करू शकतो. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सूर्यकुमार यादव आहे.
गुजरात टायटन्सविरुद्ध सूर्यकुमार यादवची कामगिरी जबरदस्त राहिली आहे, विशेषतः रशीद खानविरुद्ध. आयपीएलमध्ये सूर्याने
रशीदच्या ५८ चेंडूंचा सामना केला आहे आणि १४८.२७ च्या स्ट्राईक रेटने २८६ धावा केल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रशीद खान आतापर्यंत एकदाही सूर्याला बाद करू शकलेला नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा गुजरात आणि मुंबई एकमेकांसमोर येतील, तेव्हा दोन्ही खेळाडूंमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.
Next 🆙 👉 #GTvMI 💪🔥
Paltan, let’s relive Surya दादा’s 𝐢𝐜𝐨𝐧𝐢𝐜 𝟏𝟎𝟑* 🆚 Gujarat Titans back in 2023! 👇https://t.co/lBxchByUD3#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2025
सूर्यकुमार यादवचा गुजरात टायटन्सविरुद्धचा रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. आतापर्यंत त्याने ४ सामन्यांमध्ये ६६.६७ च्या सरासरीने आणि १८१.८२ च्या स्ट्राईक रेटने २०० धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद १०३ धावा आहे. सूर्याने गुजरातविरुद्ध एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. जर त्याच्या बॅटने येत्या सामन्यात चांगली कामगिरी केली तर कोणत्याही गोलंदाजाला त्याला रोखणे सोपे जाणार नाही. त्याच वेळी, गुजरातचे गोलंदाज सूर्याला लवकर बाद करण्याचा प्रयत्न करतील.
Who ever thought this will be his last 50 v CSK in Chepauk😔
It’s been fkin 6 yrs now mann#SuryakumarYadav pic.twitter.com/sESaev261U
— Soham (@suryaxtripti) March 26, 2025
आयपीएलमध्ये आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स ५ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये गुजरातने ३ वेळा विजय मिळवला आहे, तर मुंबईने २ वेळा विजय मिळवला आहे. हा सामना जिंकून मुंबईला या विक्रमाची बरोबरी करायची आहे. मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्या या सामन्यात पुनरागमन करेल. हार्दिकने आयपीएल २०२५ मध्ये मुंबईसाठी पहिला सामना खेळला नाही कारण गेल्या हंगामात स्लो ओव्हर रेटमुळे त्याला एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली होती.