
MI vs GT, WPL Live Score: Harmanpreet Kaur's explosive innings snatched victory from GT! MI secured a thrilling 3-wicket win.
MI vs GT, WPL Live Score : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स सामन्यात मुंबईने बाजी मारली. नाणेफेक गमावणाऱ्या गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करत दिलेले १९३ धावांचे लक्ष्य मुंबईच्या कर्णधार हरमनप्रीत कौरच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे.
नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गुजरातला प्रथम फलंदाजीसाथी आमंत्रित केले. गुजरातने ५ विकेट्स गमावून १९२ धावा केल्या आणि मुंबईला १९३ धावांचे लक्ष्य दिले. या धावांचा पाठलाग कलारायला उतरलेल्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. जी कमलिनी १३ धावा करून बाद झाली. त्यानंतर हेले मॅथ्यूजही २२ धावा करून माघारी गेली. एकवेळ वाटत होते मुंबईच्या हातातून सामना गेला असे वाटत असताना मात्र संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने अमनजोत कौरला साथीला घेत डाव सावरला. या दोघींनी ७२ धावांची भागीदारी रचली आणि संघाला सुस्थितीमध्ये आणले. अमनजोत कौर २६ चेंडूत ४० धावा करून बाद झाली. त्यानंतर कौरने निकोला केरीसोबत ९३ धावांची भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. हरमनप्रीत कौरने ४३ चेंडूत नाबाद ७१ धावा केल्या. खेळीत तिने ७ चौकार आणि २ षटकार लगावले. तर निकोला केरीने २३ चेंडूचा सामना करत नाबाद ३८ धावा केल्या. यामध्ये तिने ६ चौकार लगावले. राजेश्वरी गायकवाड, सोफी डिव्हाईन आणि रेणुका सिंग ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजरात जायंट्स प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. गुजरात जायंट्सने फलंदाजी करत ५ गडी गमावून १९२ धावा केल्या. सोफी डिव्हाईन ८ , बेथ मूनी ३३, कनिका आहुजा ३५, ॲशले गार्डनर २०, आयूषी शिवानी ११ , जॉर्जिया वेअरहॅम नाबाद ४३, भारती फुलमाळी नाबाद ३६ धावा केल्या मुंबई इंडियन्सकडून हेले मॅथ्यूज, शबनिम इस्माईल, अमेलिया केर आणि निकोला केरी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : हेले मॅथ्यूज, जी कमलिनी(यष्टीरक्षक), अमेलिया केर, हरमनप्रीत कौर(कर्णधार), निकोला केरी, सजीवन सजना, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, पूनम खेमनार, शबनिम इस्माईल, त्रिवेणी वसिष्ठ
गुजरात जायंट्स प्लेइंग इलेव्हन : बेथ मूनी(यष्टीरक्षक), सोफी डिव्हाईन, ॲशले गार्डनर(कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, भारती फुलमाळी, आयुषी सोनी, कनिका आहुजा, काश्वी गौतम, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर