MI vs SRH: Nita Ambani was red-faced with anger during the live match, while Hardik Pandya was also seen angry, what happened.., watch the video
MI vs SRH : काल वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२५ मधील ३३ वा सामना पार पडला. सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चार विकेट राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत हैदराबादने विजयासाठी 163 धावांच लक्ष्य उभे केले होते. मुंबई इंडियन्सने 19 व्या ओव्हरमध्येच लक्ष्य पूर्ण करून विजय मिळवला. १८ व्या हंगामातील मुंबई इंडियन्सचा हा तिसरा विजय ठरला आहे. या सामन्यात एक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबई इंडियन्सच्या मालकीण असणाऱ्या नीता अंबानी संतापल्याच दिसून आलं. नेमकं काय घडलं याबाबत आपण जाणून घेऊया.
सनरायजर्स हैदराबादच्या इनिंगमध्ये हार्दिक पांड्या 8 वे षटक टाकत होता. या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर ट्रेविस हेडने बॅकवर्ड पॉइंटला कट मारला असता चेंडू हवेत होता. मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने उजव्या बाजूला झेप घेऊन डाइव्ह मारली. परंतु, त्याला तो झेल घेता आला घेता आली नाही आणि चेंडू थेट सीमारेषेपार जाऊन पोहचला. त्यावर हार्दिक पंड्या खूप चिडेलला दिसून आला. इतकेच नाही तर डगआऊटमध्ये बसून असलेल्या फ्रेंचायजी मालक नीता अंबानी या सुद्धा संतापल्याच स्पष्ट दिसून आलं.
हेही वाचा : MI vs SRH : सूर्यकुमार यादव ‘हे’ काय करून बसला? लाईव्ह सामन्यात अभिषेक शर्माचे तपासले खिसे अन्… पहा व्हिडिओ
ट्रेविस हेड या सामन्यात फार मोठी खेळी करु शकला नाही. 29 चेंडूत 28 धावा करुन तो तबूत परतला. या दरम्यान त्याने 3 चौकार लगावले. मारले. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज विल जॅक्सने त्याला सँटनरकरवी झेलबाद केले. ट्रेविस हेडचा मुंबई इंडियन्सविरुद्ध धावा बनवण्यासाठी संघर्ष करताना दिसून आला. त्याने 96.55 च्या स्ट्राइक रेटने 28 धावा केल्या.
The reactions of Nita Ambani.#MIvSRH pic.twitter.com/fqXZMMQvwF
— The sports (@the_sports_x) April 17, 2025
हेही वाचा : IPL 2025 : गुजरात टायटन्स संघात अष्टपैलू खेळाडूचा प्रवेश! एक हाती सामना फिरवायची ठेवतो ताकद..
मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करायला सनरायझर्स हैदराबाद मैदानात उतरला. त्यांनी २० षटकांत ५ गडी गमावून १६२ धावा केल्या. हैदराबादची सुरुवात चांगली झाली पण मधल्या षटकांमध्ये धावा काढण्यात संघाला खूप संघर्ष करावा लगत असल्याचे दिसत होते. हैदराबादकडून अभिषेक शर्माने ४०, ट्रॅव्हिस हेडने २८, नितीश रेड्डीने १९, क्लासेनने ३७ आणि अनिकेत वर्माने नाबाद १८ धावा केल्या. तर मुंबई इंडियन्सकडून विल जॅक्सने २, बुमराहने १, हार्दिक पंड्याने १ आणि बोल्टने १ विकेट मिळवली.
प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सने या लक्ष्याचा पाठलाग करताना ६ विकेट्स गमावून सामना आपल्या नावे केला. मुंबईकडून रायन रिकेल्टनने ३१, रोहित शर्माने २६, विल जॅक्सने ३६, सूर्यकुमार यादवने २६, तिलक वर्मा यांनी २१ आणि हार्दिक पंड्याने २१ धावा करून संघाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका वठवली. सनरायझर्स हैदराबादकडून पॅट कमिन्सने ३, इशान मलिंगाने २ आणि हर्षल पटेलने १ विकेट घेतली.