Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर

Mitchell Starc No 1 left Handed test bowler: मिचेल स्टार्क आता कसोटी क्रिकेटमधील डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी हा विश्वविक्रम केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 13, 2026 | 02:22 PM
Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर
Follow Us
Follow Us:
  • मिचेल स्टार्कचा विक्रम
  • बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर
  • सादमान इस्लामला बाद करून इतिहास रचला

ऑस्ट्रेलिया स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या १९८ धावांवर सर्वबाद झाला. जेव्हा बांग्लादेशने फलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा मिचेल स्टार्कने पहिली विकेट घेतली. या विकेटसह, मिचेल स्टार्क कसोटी क्रिकेटमधील डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे, त्याने ही कामगिरी आंतरराष्ट्रीय डावखुरे खेळाडू दिनी केली.

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया हरली तरी Gautam Gambhir यांची खुर्ची कायम? BCCI चा मोठा निर्णय

स्टार्कने सादमान इस्लामला बाद करून इतिहास रचला

बांग्लादेश फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यांचे सलामीवीर, सादमान इस्लाम आणि तन्झिद हसन तमीम यांनी संघाला स्थिर सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला, पण डावाच्या नवव्या षटकात, मिचेल स्टार्कने दुसऱ्याच चेंडूवर सादमान इस्लामला बाद केले. नॅथन लायनने सादमानचा झेल घेतला. त्याने ३० चेंडूंमध्ये दोन चौकारांसह २० धावा केल्या होत्या. या विकेटसह मिचेल स्टार्कने आपली ४३४ वी कसोटी विकेट पूर्ण केली.

कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे डावखुरे गोलंदाज

  • ४३४ – मिचेल स्टार्क
  • ४३३ – रंगना हेराथ
  • ४१४ – वसीम अक्रम
  • ३६२ – डॅनियल व्हेटोरी
  • ३५५ – चमिंडा वास
  • ३४८ – रवींद्र जडेजा
  • ३१७ – ट्रेंट बोल्ट
  • ३१३ – मिचेल जॉन्सन
  • ३११ – जहीर खान
  • २९७ – डेरेक अंडरवुड

रंगना हेराथचा विक्रम मोडला, कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी

मिचेल स्टार्क आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. त्याने रंगना हेराथचा विक्रम मोडला. डावखुरा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने ४१४ विकेट्स घेतले होते. आज, १३ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय डावखुरा खेळाडू दिन साजरा केला जातो आणि याच दिवशी मिचेल स्टार्कने हा विक्रम केला. एवढेच नाही तर, स्टार्कने आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत भारताच्या महान खेळाडूंपैकी एक असलेल्या कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आणखी एक विकेट घेताच तो त्यांनाही मागे टाकेल.

स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक, इतर फलंदाज स्वस्तात बाद

बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी, पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु टी- ब्रेक विश्रांतीनंतर थोड्याच वेळात संपूर्ण संघ केवळ १९८ धावांवर सर्वबाद झाला . स्टीव्ह स्मिथने अर्धशतक झळकावले, पण इतर कोणत्याही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. यामुळे बांग्लादेशविरुद्ध प्रथमच ऑस्ट्रेलियाचा संघ २०० पेक्षा कमी धावांवर सर्वबाद झाला.

Cricket News: ३० व्या वर्षी क्रिकेटला अलविदा! गंभीर दुखापतीमुळे ‘या’ स्टार ऑलराउंडरची कारकीर्द संपुष्टात

Web Title: Mitchell starc surpasses rangana herath to script massive test record 434 wickets against bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • ICC Rankings
  • Mitchell Starc
  • Test Match

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.