इंग्लंडचा अष्टपैलू आणि ससेक्सचा खेळाडू डॅनी लॅम्बने मानेच्या गंभीर दुखापतीमुळे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी प्रोफेशनल क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामाच्या सुरुवातीला त्याच्या मानेत डिस्क हर्निएशनची दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याच्या मणक्यालाही इजा झाली. गेल्या महिन्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. परंतु दुखापतीचे दुष्परिणाम कायम राहिले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लॅम्बने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. लॅम्बची व्यावसायिक कारकीर्द एका दशकाहून अधिक काळ चालली, ज्या दरम्यान त्याने लँकेशायर आणि ससेक्सचे प्रतिनिधित्व केले आणि विविध फॉरमॅटमध्ये संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
डॅनी लॅम्बच्या मानेत डिस्क हर्निएशनची दुखापत झाली, ज्यामुळे त्याच्या मणक्याला इजा झाली. लॅम्बने आपल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, परंतु असे करूनही दुखापत पूर्णपणे बरी झाली नाही. शेवटी डॉक्टरांनी त्याला क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा सल्ला दिला. लॅम्बच्या कारकिर्दीत, त्याने ससेक्स आणि लँकेशायरसाठी सर्व फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले. निवृत्तीच्या निर्णयाबद्दल लॅम्ब म्हणाला की, ‘दुखापतीमुळे माझ्या कारकिर्दीचा शेवट स्वीकारणे अत्यंत कठीण आहे. वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर, मला खात्री आहे की माझ्या दीर्घकालीन आरोग्यासाठी हाच निर्णय योग्य आहे. लँकेशायर आणि ससेक्सचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. मी नेहमीच संघासाठी माझे सर्वोत्तम देण्याचा आणि त्यांच्या विजयात योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.’ लॅम्बने ससेक्स संघाच्या अलीकडील यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डॅनी लॅम्बच्या क्रिकेट कारकिर्दीतील प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये ३८ सामने खेळून १२३२ धावा केल्या आहेत. तसेच, ६८ विकेट्स घेतले आहेत. लिस्ट ए मध्ये लॅम्बला ३४ सामने खेळण्याची संधी मिळाली असून, त्याने फलंदाजी करताना ४५ विकेट्स घेतले आहेत आणि ५९२ धावा केल्या आहेत. लॅम्बची टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी या देन्ही विभागात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने ६१ विकेट्स घेतले आणि एकूण ५७८ धावा केल्या.
लॅम्बने ससेक्स संघाच्या अलीकडील यशात महत्त्वाची भूमिका बजावली. तो काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डिव्हिजन वनमध्ये प्रमोशन मिळवणारी आणि टी२० ब्लास्टच्या फायनल्स डे पर्यंत मजल मारणाऱ्या संगाचा भाग होता. ससेक्सचे मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेट संचालक पॉल फारब्रेस यांनीही लॅम्बच्या निवृत्तीवर आपले मत मांडले. ते म्हणाले की, कोणत्याही खेळाडूने दुखापतीमुळे खेळ सोडणे दुःखद असते आणि लॅम्बने आपल्या वचनबद्धतेने आणि कौशल्याने क्लबसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. फारब्रेस म्हणाले की, ‘काउंटी चॅम्पियनशिपमध्ये संघाला डिव्हिजन वनमध्ये प्रमोशन मिळवून देण्यात आणि टी२० ब्लास्टच्या फायनल्स डे पर्यंत पोहोचण्यात लॅम्बने महत्त्वाची भूमिका बजावली.’





