Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’

आशिया कप 2025 च्या सुरुवातीपूर्वीच मोहम्मद कैफने भारतीय संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाशिंग्टन सुंदरला संधी न मिळाल्याने संघात मोठी उणीव निर्माण होईल, असे कैफचे मत आहे. वाचा सविस्तर बातमी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 08, 2025 | 05:05 PM
आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’
Follow Us
Close
Follow Us:

Asia Cup 2025: आशिया कपचा 2025 थरार (Asia Cup 2025) लवकरच सुरु होणार आहे. सर्व संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) पोहोचले आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार असून, संघात शुभमन गिल, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ मजबूत दिसत असला तरी, माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याच्या मते, एका खेळाडूची अनुपस्थिती संघाला नक्कीच जाणवेल.

वाशिंग्टन सुंदरला वगळल्याने कैफ नाराज

कैफने ज्या खेळाडूच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तो दुसरा कोणी नसून स्टार अष्टपैलू वाशिंग्टन सुंदर आहे. आशिया कपसाठीच्या मुख्य 15 खेळाडूंमध्ये सुंदरला स्थान मिळाले नाही, त्याला 5 राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ, जर एखादा खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला, तरच त्याला संघात प्रवेश मिळू शकेल. कैफच्या मते, सुंदरला मुख्य संघात स्थान मिळायला हवे होते.

Rohit’s team won the T20 World Cup with 3 all-rounders – Axar, Jadeja, Hardik – and that meant 6 proper bowling options and batting till 8. At Asia Cup, with only 2 genuine allrounders – Hardik and Axar. – India will have to find a new winning combination. Washington Sundar will… — Mohammad Kaif (@MohammadKaif) September 8, 2025

सुंदर का महत्त्वाचा होता? कैफने सांगितले कारण

मोहम्मद कैफने 2019 च्या टी-20 विश्वचषकातील विजयाचे उदाहरण देत सांगितले की, संघात जास्त गोलंदाजीचे पर्याय असणे किती आवश्यक आहे. कैफने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “रोहितच्या संघाने टी-20 विश्वचषक अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या तीन अष्टपैलू खेळाडूंसह जिंकला होता. याचा अर्थ त्यांच्याकडे गोलंदाजीचे 6 चांगले पर्याय आणि फलंदाजीचे 8 पर्याय होते. आशिया कप 2025 मध्ये भारताकडे फक्त दोनच मुख्य अष्टपैलू खेळाडू आहेत – हार्दिक आणि अक्षर. त्यामुळे भारताला एक नवीन विजयी संयोजन शोधावे लागेल. याच कारणामुळे वाशिंग्टन सुंदरची उणीव नक्कीच भासेल.”

हे देखील वाचा: PAK vs AFG : आशिया कपपुर्वी अफगाणिस्तानची लाजिरवाणी कामगिरी! अंतिम सामन्यात पाकिस्तानने तोडले लचके.. 

वाशिंग्टन सुंदरचे टी-20 क्रिकेटमधील प्रदर्शन

वाशिंग्टन सुंदरच्या टी-20 कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने भारतासाठी आतापर्यंत 54 टी-20 सामन्यांत 193 धावा केल्या असून, 48 विकेट्सही घेतल्या आहेत. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजी करणाऱ्या सुंदरची गोलंदाजी शैली निवृत्त झालेल्या आर. अश्विनसारखी आहे, म्हणूनच त्याला भारताचा ‘दुसरा अश्विन’ असेही म्हटले जाते.

आशिया कप 2025साठी भारतीय संघ:

  • मुख्य खेळाडू: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जितेश शर्मा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
  • राखीव खेळाडू: प्रसिद्ध कृष्णा, वाशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल.

Web Title: Mohammad kaif slams team india squad asia cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Mohammad Kaif
  • Team India
  • Washington Sundar

संबंधित बातम्या

IND vs AUS T20 Toss Update : सुर्याच्या टोळीसमोर कांगारुचे आव्हान! मिचेल मार्शने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करणार
1

IND vs AUS T20 Toss Update : सुर्याच्या टोळीसमोर कांगारुचे आव्हान! मिचेल मार्शने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करणार

आई ती आईचं…! छठ पूजेदरम्यान सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरच्या तब्ब्येतीसाठी केली प्रार्थना, पाहा व्हिडिओ
2

आई ती आईचं…! छठ पूजेदरम्यान सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरच्या तब्ब्येतीसाठी केली प्रार्थना, पाहा व्हिडिओ

IND vs AUS Weather Report : कॅनबेरामधील पहिला T20 सामना पावसामुळे खराब होणार का? जाणून घ्या कसे असेल हवामान
3

IND vs AUS Weather Report : कॅनबेरामधील पहिला T20 सामना पावसामुळे खराब होणार का? जाणून घ्या कसे असेल हवामान

IND vs AUS Pitch Report : आज कॅनबेराची कशी असेल खेळपट्टी? कोणाला होणार पिचचा फायदा, वाचा सविस्तर
4

IND vs AUS Pitch Report : आज कॅनबेराची कशी असेल खेळपट्टी? कोणाला होणार पिचचा फायदा, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.