पाकिस्तान वि अफगाणिस्तान(फोटो-सोशल मीडिया)
PAK vs AFG : आशिया कप २०२५ पूर्वी अफगाणिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. तिरंगी मालिकेत पाकिस्तान संघाने अफगाणिस्तानचा ७५ धावांनी पराभव केला. टी-२० च्या तिरंगी मालिकेत पाकिस्तान संघाने विजय मिळवत आपल्या चाहत्यांना आशिया कपपूर्वी आनंदवार्ता दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या या विजयाचा अष्टपैलू मोहम्मद नवाज हीरो ठरला आहे. त्याने बॅट आणि बॉल दोन्हीने आपली शानदार कामगिरी करत पाकिस्तानला सामना जिंकून दिला. त्याने या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. या सामन्यातील पराभवानंतर अफगाणिस्तानवर मात्र मोठी नामुष्की ओढवली आहे.
हेही वाचा : अल्काराझच्या विजयाची गुरुकिल्ली कोणती? US Open 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षकांनी केला खुलासा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध १४१ धावांचे टार्गेट दिले. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला अफगाण संघ १५.५ षटकांत फक्त सर्वबाद ६६ धावाच करू शकला. या कामगिरीने अफगाणिस्तान संघाने नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेच्या अंतिम सामन्यात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. या विक्रमात आता अफगाणिस्तान संघाने नॉर्वेजियन क्रिकेट संघाला देखील पिछाडीवर टाकले. २०२४ मध्ये नॉर्वेने जर्सीविरुद्ध ६९ धावा उभारल्या होत्या. तर, २०१७ मध्ये आयर्लंडने अफगाणिस्तानविरुद्ध ७१ धावा काढल्या होत्या.
तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान संघाने अफगाणिस्तानविरुद्ध १४१ धावा उभारल्या होत्या. पाकिस्तानकडून कर्णधार आघाने २४ आणि मोहम्मद नवाजने २५ धावा काढल्या होत्या. पाकिस्तानने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला अफगाणिस्तानचा संघ १५.५ षटकांत केवळ सर्वबाद ६६ धावाच करू शकला. त्यानुसार, पाकिस्तानने सामना ७५ धावांनी आपल्या खिशात टाकला.
पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू महम्मद नवाजने या सामन्यात इंटईहासिक कामगिरी केली आहे. त्याने या सामन्याच्या सहाव्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन गडी माघारी पाठवले. त्यानंतर, मोहम्मद नवाजने सामन्याचा आठवा षटक टाकला आणि या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने इब्राहिम झद्रानची विकेट घेऊन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याची पहिली हॅटट्रिक पूर्ण केली. यासह, नवाज पाकिस्तानसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी कोणत्याही पाकिस्तानी फिरकी गोलंदाजाला असा पराक्रम टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करता आलेली नाही.