Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohammed Shami: शामी-हसीन जहाँ वादात मोठा ट्विस्ट! कोर्टाचा निर्णय क्रिकेटपटूसाठी दिलासादायक, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Mohammed Shami Check Bounce Case: वेगवान गोलंदाज मोहम्म्द शामीला कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपानंतर अलिपूर न्यायालयाने शामीची निर्दोष मुक्तता केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 21, 2026 | 02:34 PM
Mohammed Shami: शामी-हसीन जहाँ वादात मोठा ट्विस्ट! कोर्टाचा निर्णय क्रिकेटपटूसाठी दिलासादायक, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Follow Us
Follow Us:
  • शामी-हसीन जहाँ वादात मोठा ट्विस्ट
  • मोहम्म्द शामीला कोर्टाकडून मोठा दिलासा
  • काय आहे संपूर्ण प्रकरण?
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. विभक्त पत्नी हसीन जहाँने दाखल केलेल्या चेक बाऊन्स प्रकरणात अलिपूर न्यायालयाने मोहम्मद शामीची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने शामी यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. जवळपास चार वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते.

झेल सुटला अन् हार्दिकचा पारा चढला, BCCI ची मोठी कारवाई; MI Vs KKR सामन्यात नेमकं काय घडलं?

नेमकं प्रकरण काय ?

हसीन जहाँने आरोप केला होता की, मोहम्मद शामीने घरखर्चासाठी दिलेला १ लाख रुपयांचा चेक बँकेत जमा केल्यानंतर तो बाऊन्स झाला. त्यानंतर त्यांनी अलिपूर मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

न्यायालयाने काय म्हटलं?

बुधवारी (दि.२०) अलिपूर कोर्टाने सुनावणीदरम्यान शामी यांच्याविरोधातील आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे नमूद केले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना सर्व आरोपांतून मुक्त केले. शामी याचे वकील सलीम रहमान यांनीही या निकालाची पुष्टी केली.

निकालानंतर शामीची प्रतिक्रिया

न्यायालयाच्या निर्णयानंतर मोहम्मद शामी म्हणाला, “मला सुरुवातीपासून विश्वास होता की निकाल आमच्या बाजूने लागेल. मला जितकी रक्कम देणे आवश्यक होते, ती मी पूर्णपणे दिली आहे. तो पुढे म्हणाला, मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर, प्रत्येक परिस्थितीचा सर्वोत्तम पद्धतीने सामना करण्याचा मी प्रयत्न करतो.”

देखभाल खर्चाचा वाद अजून कायम

चेक बाऊन्स प्रकरणात शामीला दिलासा मिळाला असला तरी त्याचा कायदेशीर संघर्ष अजून संपलेला नाही. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शामी सध्या विभक्त पत्नी हसीन जहाँला दरमहा १.५ लाख रुपये आणि मुलीच्या संगोपनासाठी २.५ लाख रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याला एकूण ४ लाख रुपये देखभाल खर्च देत आहे. मात्र, हसीन जहाँने ही रक्कम अपुरी असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिने हा देखभाल खर्च वाढवून १० लाख रुपये करण्याची मागणी केली आहे.

२०१८ पासून सुरू आहे वाद

२०१८ मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शामी आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात आर्थिक सहाय्य आणि पोटगीसंबधित आरोपांसह इतरही गंभीर आरोप करत अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण सतत चर्चेत राहिले. काही काळासाठी बीसीसीआयने शामीचा करारही स्थगित केला होता, मात्र चौकशीनंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती. सध्या मोहम्मद शमी आयपीएलमध्ये लखनौ संघाकडून खेळत आहे. मैदानावरील प्रभावी गोलंदाजीसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे तो गेल्या काही वर्षांत सातत्याने चर्चेत राहिला आहे.

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे

Web Title: Mohammed shami acquitted cheque bounce case alipore court verdict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Calcutta High Court
  • IPL 2026
  • Mohammad Shami

संबंधित बातम्या

नेदरलँड्समध्ये पहिल्यांदाच १२ वर्षांखालील मुलाला इच्छामरण; डॉक्टरांची चौकशी सुरू
1

नेदरलँड्समध्ये पहिल्यांदाच १२ वर्षांखालील मुलाला इच्छामरण; डॉक्टरांची चौकशी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.