Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये Mohammed Shami चा जलवा, 4 ओव्हरमध्ये सर्वात कमी धावा देत रचला इतिहास

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने IPL २०२६ च्या हंगामात आपल्या अनुभवाच्या जोरावर एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मोहम्मद शमी २०२६ च्या IPL सीझनमध्ये 'लखनौ सुपर जायंट्स' (LSG) कडून खेळत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 05, 2026 | 06:26 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • मोहम्मद शमी याने IPL २०२६ च्या हंगामात ऐतिहासिक कामगिरी
  • कोणता रचला इतिहास?
  • गेल्या हंगामात SRH संघाचा भाग
Mohammed Shami, IPL 2026: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने IPL २०२६ च्या हंगामात आपल्या अनुभवाच्या जोरावर एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मोहम्मद शमी २०२६ च्या IPL सीझनमध्ये ‘लखनौ सुपर जायंट्स’ (LSG) कडून खेळत आहे. या स्पर्धेतील १० वा लीग सामना सध्या हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर ‘सनरायझर्स हैदराबाद’ (SRH) आणि लखनौ यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात, शमीने अशी एक कामगिरी करून इतिहास रचला आहे.

IPL 2026 : Hardik Pandya मैदानात कधी परतणार? Mumbai Indians च्या कॅप्टन्सीच्या पेचात मोठी अपडेट

कोणता रचला इतिहास?

महत्त्वाच्या सामन्यात शमीने आपल्या ४ षटकांच्या सर्वात कमी धावा देण्याचा विक्रम प्रस्थापित करत आयपीएलच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाला साध्य करता आली नव्हती. शमीने आपल्या ४ षटकांच्या गोलंदाजीत केवळ ९ धावा दिल्या आणि २.२० च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. या प्रक्रियेत त्याने २ विकेट्स घेतले. या आकडेवारीसह, शमी ‘लखनौ सुपर जायंट्स’साठी ४ षटकांच्या गोलंदाजीत सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, हा विक्रम कृणाल पांड्याच्या नावावर होता. २०२२ च्या हंगामात, कृणालने ४ षटकांच्या गोलंदाजीत ११ धावा दिल्या होत्या आणि २.७५ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली होती.

लखनौसाठी सर्वात किफायतशीर गोलंदाजी करणारे गोलंदाज :

२/९ – मोहम्मद शमी विरुद्ध हैदराबाद, हैदराबाद, २०२६ (२.२० इकॉनॉमी)
२/११ – कृणाल पांड्या विरुद्ध पंजाब, पुणे, २०२२ (२.७५ इकॉनॉमी)
३/११ – कृणाल पांड्या विरुद्ध गुजरात, लखनौ, २०२४ (२.७५ इकॉनॉमी)

गेल्या हंगामात SRH संघाचा भाग

गेल्या हंगामात मोहम्मद शमी ‘सनरायझर्स हैदराबाद’ या संघाकडून खेळत होता. २०२५ चा सिझनमध्ये तो फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. तो सीझन त्याच्यासाठी अत्यंत निराशाजनक ठरला; ९ सामन्यांमधील ९ डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याला केवळ ६ बळी मिळवता आले होते. या काळात, शमीने ११.२३ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या होत्या. त्यामुळे संघाने शमीला एका ‘ट्रेड डील’मध्ये टीमने ‘लखनौ सुपर जायंट्स’ला खेळाडू दिला. पण आता आपल्याच जुन्या संघाविरुद्ध भेदक गोलंदाजी करत शमीने एक नवीन विक्रम बनवला आहे. यापूर्वी, दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, शमीने ४ षटकांत २८ धावा देत १ बळी मिळवला होता.

शमीची IPL कारकीर्द

शमीच्या IPL कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत १२१ सामने खेळले आहेत. या सामन्यांमधील १२१ डावांमध्ये गोलंदाजी करताना, शमीने २७.८३ च्या सरासरीने १३६ बळी मिळवले आहेत; ज्यामध्ये ११ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्याचा इकॉनॉमी रेट ८.५५ राहिला आहे. त्याने दोन प्रसंगी ‘चार बळी घेण्याची’ कामगिरी नोंदवली आहे.

IPL 2026 : MS Dhoni मैदानात उतरणार की नाही? RCB vs CSK सामन्यापूर्वी ‘थाला’च्या फिटनेसवर मोठी अपडेट

Web Title: Mohammed shami shines in ipl 2026 creates history by conceding the fewest runs in 4 overs marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • IPL 2026
  • IPL 2026. Cricket
  • LSG
  • Mohammed Shami
  • SRH

संबंधित बातम्या

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये ‘करो या मरो’ स्थिती; राजस्थानने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
1

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये ‘करो या मरो’ स्थिती; राजस्थानने टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

IPL 2026 मध्ये टॉप 2 साठी महायुद्ध! ‘या’ जागांसाठी ‘आर-पार’ची लढाई, कोणाला मिळणार Qualifier-1 चे तिकीट?
2

IPL 2026 मध्ये टॉप 2 साठी महायुद्ध! ‘या’ जागांसाठी ‘आर-पार’ची लढाई, कोणाला मिळणार Qualifier-1 चे तिकीट?

संकटे आली दारात! IPL 2026 मध्ये MI ला प्रचंड मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार जखमी अन्…
3

संकटे आली दारात! IPL 2026 मध्ये MI ला प्रचंड मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार जखमी अन्…

IPL 2026 Playoffs: असं कुठं असतंय व्हय? जागा एक अन् दावेदार अनेक; SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ
4

IPL 2026 Playoffs: असं कुठं असतंय व्हय? जागा एक अन् दावेदार अनेक; SRH च्या एका विजयाने मोठी उलथापालथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.