IND VS AUS: 'If I can play Ranji Trophy...', Mohammed Shami finally breaks his silence, targets Team India selectors
Mohammed Shami on Indian cricket team selectors : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर ५ टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर सारख्या स्टार फलंदाजांची एकदिवसीय संघात निवड करण्यात आली आहे. दरम्यान, बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी संघात वर्णी लागलेली नाही. पश्चिम बंगालकडून रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी ईडन गार्डन्सवर उतरणाऱ्या शमीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा : IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलियन भूमीवर बाजी मारेल का? रेकॉर्ड तर काही वेगळच सांगतो; वाचा सविस्तर
नेमकं काय म्हणाला शमी?
मोहम्मद शमीने आपली निराशा व्यक्त करताना माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “भारतीय संघ निवड माझ्या हातात नाही. माझे काम तयारी करण्याबरोबर सामने खेळणे आहे. जर मला तयारीसाठी सामने मिळाले किंवा मला कुठेही खेळण्याची संधी मिळाली तर मी त्यासाठी तयार असणार आहे. जर काही फिटनेस समस्या असती तर मी येथे आज नसतो. जर मी चार दिवसांचे सामने खेळू शकलो तर मी ५० षटकांचे एकदिवसीय सामने देखील खेळूच शकतो.” असे बोलत शमीने आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.
मोहम्मद शमी पुढे म्हणाला की, “निवडकर्त्यांना किंवा संघ व्यवस्थापनाला माझ्या फिटनेसबद्दल माहिती देणे ही काही माझी जबाबदारी नाही. माझे काम तयारी करणे, सामने खेळणे आणि चांगली कामगिरी करणे इतकेच आहे. अपडेट्स शेअर करणे हे व्यवस्थापन किंवा निवडकर्त्यांवर अवलंबून असून मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो. मी बराच काळ क्रिकेटपासून लांब आहे. परंतु मी चांगल्या स्थितीत आहे आणि नियमितपणे सराव करत आहे. माझे ध्येय नेहमीच पूर्णपणे तंदुरुस्त असताना संघात परतणे आहे, खूप लवकर येऊन दुखापती वाढवण्याचा धोका पत्करणे नाही.” असे मत शमीने व्यक्त केले.
उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल यांच्यातील सामन्यात शमी बंगालकडून खेळताना दिसणार आहे. बंगालच्या गोलंदाजी युनिटबद्दल तो म्हणाला की, “आमची गोलंदाजी युनिट हे खूप मजबूत आहे. आमच्याकडे आकाश, मुकेश, सूरज, कैफ आणि मी असून मला आशा आहे की हा गोलंदाजी गट आम्हाला पुढे घेऊन जाण्यास चांगली मदत करेल..”