टीम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS ODI Series : नुकतीच शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप दिला आहे. आता भारतीय संघ १५ ऑक्टोबर रोजी आता ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारतीय संघ पर्थला रवाना होईल, जिथे मालिकेचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. त्यानंतर, दोन्ही देश पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत आमनेसामने येणार आहेत. शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली आहे आणि त्याने त्याच्या पहिल्याच मालिकेत इतिहास देखील रचला आहे. ऑस्ट्रेलियन दौऱ्यापूर्वी, रोहितच्या जागी गिललला एकदिवसीय स्वरूपाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिला एकदिवसीय सामना ६ डिसेंबर १९८० रोजी सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात आला होता. भारतीय संघाने मेलबर्नमध्ये हा सामना ६६ धावांनी आपल्या नावावर केला होता. पुढचा सामना सिडनीमध्ये खेळला गेला होता. या सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला होता. १८ डिसेंबर रोजी झालेला हा सामना १०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.
या दोन सामन्यांसह, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या भूमीवर ५४ सामने खेळलेले आहेत. त्यापैकी फक्त १४ जिंकले आणि ३८ सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताचा विजय-पराजय विक्रम ०.३६८ टक्के असून या काळात भारताचा सर्वाधिक धावा ३३८ धावा होत्या, तर सर्वात कमी धावा ६३ इतक्या राहिल्या होत्या.
हेही वाचा : ICC Ranking मध्ये उलटफेर! ऑस्ट्रेलियाच्या Alyssa Healy ची मोठी झेप; ‘या’ खेळाडूला बसला मोठा फटका
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या भूमीवर फक्त तीन द्विपक्षीय मालिका खेळलेल्या आहेत. भारताचा पहिला दौरा २०१५-२०१६ मध्ये होता, जेव्हा टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका १-४ अशी गमावली होती. त्यानंतर भारताने २०१८-२०१९ मध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, जिथे भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी आपल्या खिशात टाकली होती. भारतीय संघाने आपला शेवटचा २०२०-२०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता आणि त्या दौऱ्यात भारताच्या वाट्याला १-२ असा पराभव आला होता.