Mohammed Shami's return to Team India is not possible! This former player's sensational statement is in the news
Aakash Chopra’s commentary on Mohammed Shami : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघात मैदानावर दिसून येत नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देखील मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. शिवाय, कसोटी मालिकेनंतर त्याला एकदिवसीय आणि टी-२० संघात देखील स्थान मिळालेले नाही. त्याच्याकडे सतत दुर्लक्षित केल्यानंतर, या भारतीय वेगवान गोलंदाजाच्या भविष्याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले आहेत. शमी शेवटचा २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसून आला होता. जिथे त्याने संघासाठी शानदार कामगिरी केली होती. अशातच माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने शमीच्या भविष्याबाबत मोठे विधान केले आहे.
हेही वाचा : ताजी ICC Test Rankings जाहीर! टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाला फटका! जोचे अव्वल ‘रूट’ कायम
माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राकडून अलीकडेच शमीच्या भविष्याबद्दल मोठे विधान करण्यात आले आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, “मला शमीबद्दल चांगले वाटत नसून त्याचे नाव अद्याप संघात समाविष्ट करण्यात आलेले नाही. तर त्याच्या पुनरागमनाची शक्यता असल्याचे दिसत आहे. शमीने घरगुती क्रिकेट खेळायला हवे होते, आणि तो आहे, परंतु तो या शर्यतीत खूप मागे दिसत आहे. तथापि, आपल्याकडे वेगवान गोलंदाजांचा मोठा गट नाही, त्यामुळे भविष्यात शमीचे पुनरागमन अशक्य आहे असे म्हणणे देखील कठीण आहे. जर त्याला पुनरागमन करायचे असेल तर त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल.” आकाशने असे देखील म्हटले आहे की, शमीमध्ये क्षमता आहे आणि त्याचा अनुभव संघात समाविष्ट करण्यात येऊ शकतो. परंतु सध्याच्या परिस्थितीत ते सोपे आहे असे वाटत नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, शमीचा आयपीएल २०२५ चा हंगाम फारसा चांगला राहिला नाही. सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असताना तो आपला जुना फॉर्म दाखवू शकला नाही. शिवाय, त्याला दुखापतींचा देखील अनेक वेळा सामना करावा लागला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शमी काही सामने खेळेल असे बोलले जात होते, परंतु तसे काही झाले नाही. इंग्लंड दौऱ्यात निवडकर्त्यांनी मोहम्मद शमीकडे कानाडोळा केला.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची कामगिरी प्रभावी राहिली आहे. त्याने ५ सामन्यांमध्ये एकूण ९ बळी घेत टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तथापि, अंतिम सामन्यात शमी महागडा ठरला होता, त्याने ९ षटकांत ७४ धावा दिल्या होत्या.