
मोहम्मद सिराजने अनेकदा चेंडूने कहर केला आहे, पण आज त्याने आपल्या बॅटने कहर केला. श्रीलंका क्रिकेट इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटक टाकण्यासाठी केशरा नुवान्था आला. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर पाय उचलून काऊ कॉर्नरवरून एक शानदार षटकार ठोकला. यानंतर, सिराजने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या दुसऱ्या फुल लेंथ चेंडूवरही षटकार मारला आणि तिसऱ्या चेंडूवर मिडविकेटवरून षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. मात्र, हा एक सराव सामना असल्याने विजय मिळूनही, सर्व सहा चेंडू शेवटच्या षटकातच टाकण्यात आले. या डावात मोहम्मद सिराजने १५ चेंडूंचा सामना करत ३२ धावांची शानदार नाबाद खेळी केली, ज्यात त्याने चार षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. सामन्यानंतर, जेव्हा मोहम्मद सिराज श्रीलंकेच्या खेळाडूंशी हँडशेक करायला गेला, तेव्हा त्यांनी सिराजची बॅट घेतली आणि ती तपासू लागले. अगदी श्रीलंकेच्या संघाचे खेळाडूही त्याच्या फलंदाजीने थक्क झाले.
DSP GOES 6️⃣ 6️⃣ 6️⃣! 🔥 Mohammed Siraj signs off the warm-up game with three sixes on the trot! 💥 #SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameofTestCricket pic.twitter.com/poApnwLVwu — Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 9, 2026
कोलंबो येथे श्रीलंका इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्याच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी, श्रीलंकेने २००/६ धावांवर आपला डाव घोषित केला. पहिल्या डावात ६ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताला विजयासाठी २०७ धावांची गरज होती. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी शतकी भागीदारी करून शानदार सुरुवात करून दिली. परंतु, भारताला विजयासाठी एका षटकात १६ धावांची गरज होती. तेव्हा मोहम्मद सिराजने बॅटने एक विलक्षण कामगिरी करून दाखवली.
सराव सामन्याच्या शेवटच्या दिवशी जेव्हा टीम इंडियाला आणखी एक दिलासादायक बातमी होती. कर्णधार शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. कारण बोटाच्या दुखापतीमुळे तो सराव सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांपासून संघाबाहेर होता. शेवटच्या दिवशी, गिलने यशस्वी जैस्वालसोबत डावाची सुरुवात केली आणि ४४ धावा केल्या. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या यशस्वी जैस्वालनेही शानदार ६१ धावा केल्या.
IND vs SL: टीम इंडियासाठी गुड न्यूज! Shubman gill फिट, श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात