फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
मोहम्मद सिराज : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये आज मालिकेचा शेवटचा सामना रंगणार आहे. त्याआधी आता बीसीसीआयने भारताच्या संघाची घोषणा चॅम्पियन ट्रॉफीआधी करण्यात आली आहे. यामध्ये भारतच्या संघाला मोठा धक्का मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहच्या नावाने लागला आहे. भारताचा संघ जसप्रीत बुमराहच्या व्यतिरिक्त यंदा चॅम्पियन ट्रॉफी खेळणार आहे. जसप्रीत बुमराहच्या जागेवर हर्षित राणाला संघामध्ये स्थान मिळाले आहे तर मोहम्मद सिराजला देखील संघामधून वगळण्यात आले आहे.
आता भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी लावली आहे. यामध्ये त्याने तुटलेले हृदयायाचा इमोजी लावला आहे. यावर आता सोशल मीडियावर चर्चांचे उधाण आले आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील मोहम्मद सिराजच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत ४३ सामने खेळले आहेत त्यामध्ये त्याने ७१ विकेट्स घेतले आहेत. त्याचबरोबर २४.०६ ने गोलंदाजी केली आहे आणि सध्या त्याचा २७.८२ स्ट्राईक रेट आहे.
Mohammed Siraj Instagram story when BCCI selected Harshit Rana in Champions trophy..!! pic.twitter.com/7bXG1aUFrk
— MANU. (@Manojy9812) February 11, 2025
भारताच्या संघामध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंग करताना दिसतील. यशस्वी जैस्वालला चॅम्पियन ट्रॉफीमधून वगळण्यात आले आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली तर चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यरला संघामध्ये स्थान मिळाले आहे. विकेटकिपर म्हणून केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांना संघामध्ये स्थान मिळाले आहे, अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद शामी, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा यांना संघामध्ये स्थान मिळाले आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे दोघे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.
भारताचा संघ युएई मध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे सर्व सामने खेळणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीचे यजमान पद पाकिस्तानकडे आहे पण टीम इंडिया सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानला जाणार नाही. त्यामुळे आयसीसीने स्पर्धेचे आयोजन हायब्रीड पद्धतीने केले आहे. या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत या आठ संघाचे दोन गटामध्ये विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघाचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघाचा समावेश आहे.
भारताच्या संघाच्या कामगिरी चाहत्यांची नजर असणार आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. आता भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कशाप्रकारे कामगिरी करेल हे पाहणं मनोरंजक ठरेल. भारताच्या संघाचा पहिला चॅम्पियन ट्रॉफीचा सामना २० फेब्रुवारी रोजी बांग्लादेशविरुद्ध खेळवला जाणार आहे.