IND VS PAK: Mohsin Naqvi will present the trophy to the winning team of Asia Cup! What role will the Indian team take? Read in detail
Asia cup 2025 : 28 सप्टेंबर रोजी क्रिकेटप्रेमींना एका मोठ्या सामन्यांची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. आशिया कप 2025 मध्ये अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या स्पर्धेत दोन वेळा भारताने पाकिस्तान संघाला पराभूत केले आहे. आता उद्या होणाऱ्या सामन्यात देखील भारत पाकिस्तानला पराभूत करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरणार आहे. तथापि, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी रविवारी दुबई क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यावरून हे देखील स्पष्ट होते की ते विजेत्या संघाचा सन्मान देखील रतील.
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान समोरासमोर असणार आहेत. गेल्या 41 वर्षात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. अशातच बोर्डाच्या अधिकाऱ्याने सामन्याला उपस्थित राहणे सामान्य असले तरी, पुरस्कार सोहळ्यात नक्वी यांची उपस्थिती महत्त्वाची असणार आहे. कारण, एसीसी अध्यक्ष म्हणून, ते विजेत्या संघाला ट्रॉफी देण्याची जबाबदारी घेत असतात. एसीसी अध्यक्ष असण्यासोबतच, नक्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख देखील आहेत. त्यामुळे, ट्रॉफी सादर करत अवताना ते साहजिकच दोन्ही संघांच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करतील. त्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : भारताविरुद्ध पाकिस्तानचा निभाव लागणार नाही! ‘ही’ आहेत पाच कारणं; वाचा सविस्तर
तथापि, आशिया कप 2025 च्या दरम्यान भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याचे टाळले आहे. या संघात आजवर दोन सामने झाले या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळले आहे. भारतीय संघ न हलवण्याचे धोरण पाळत आहे. त्यामुळे, बीसीसीआय आपल्या खेळाडूंना नक्वीशी हस्तांदोलन करण्याची परवानगी देण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. अंतिम सामन्यादरम्यान काय होते ते हे पाहणे खुप रंजक असणार आहे. बीसीसीआयकडून अद्याप या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
मोहसीन नक्वीच्या विनंतीवरून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टवर १४ सप्टेंबरच्या सामन्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंना एकमेकांना अभिवादन करण्यापासून रोखल्याचा आरोप लावण्यात आला होता. तथापि, आयसीसीने हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
हेही वाचा : IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार ..
मोहसीन नक्वी यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववर अंतिम सामन्यातून बंदी घालण्याची देखील मागणी केली होती. कारण सूर्यकुमार यादवने पाकिस्तान विरुद्धचा विजय देशाच्या सशस्त्र दलांना समर्पित केला होता आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसोबत एकता व्यक्त करण्यात आली होती. आशिया कपशी संबंधित एका जवळच्या सूत्राकडून सांगण्यात आले आहे की, नक्वी शनिवारी संध्याकाळी दुबईला पोहचणार आणि एसीसी अध्यक्ष म्हणून विजेत्या संघाला ट्रॉफी सादर करणार आहेत. बीसीसीआय याबाबतचा निर्णय बघण्यासारखा असणार आहे.