भारत आणि पाकिस्तान(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 final ind vs pak : संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला जात असलेल्या आशिया कप २०२५ स्पर्धेत २८ सप्टेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत. तब्बल ४१ वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तान आणि भारत यांच्यात आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. चालू स्पर्धेत भारतीय संघ सलग ६ सामने जिंकला आहे. त्याने पाकिस्तान संघाला लीग आणि सुपर ४ मध्ये असे दोन वेळा पराभूत केले आहे. भारतीय संघातील खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात देखील भारत पाकिस्तानला धूळ चारेल असे बोलले जात आहे. या मागील कारणं आपण बघणार आहोत.
हेही वाचा : IND vs SL: कुलदीप यादवने वाढवली पाकिस्तानची चिंता! अंतिम सामन्यापूर्वी रचला मोठा इतिहास; वाचा सविस्तर
पाकिस्तान या स्पर्धेत कुठे आहे आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कुठे आहे. हे पाहिल्यास लक्षात येईल भारताने पकसिटण संघाला दोन वेळा पराभव केला. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला ७ विकेट्सने आणि नंतर सुपर ४ मध्ये पुन्हा ६ विकेट्सने पराभूत केले आहे. ज्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय संघ विजयाची हॅटट्रिक साजरी करू शकतो. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानने राबवलेली कोणतीच रणनीती कामात आली नाही. त्यामुळे आता देखील भारताचे पारेड जड आहे.
भारतीय संघाची फलंदाजी शानदार होताना दिसत आहे. अभिषेक शर्मा अंतिम सामन्यापूर्वी स्पर्धेत सर्वाधिक धावा खेळाडू आहे. या पाठोपाठ पाकिस्तानकडे साहिबजादा फरहान देखील धावा काढत आहे, परंतु दोघांमध्ये तुलना होऊ शकत नाही. तसेच कर्णधार सूर्यकुमारने मागील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत नसला तरी तो अंतिम सामन्यात आपली स्फोटक फलंदाजीने सामना जिंकवण्याची क्षमता ठेवतो. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे टी-२० क्रमवारीत जगातील टॉप ५ फलंदाज आहेत.
भारतीय संघाकडे सर्वोत्तम फिरकीपटू कुलदीप यादव आहे. ज्याने आतापर्यंत १३ विकेट्ससह नंबर वन गोलंदाज बनून दाखवला आहे. भारत येथेही आपले वर्चस्व गाजवण्यात सज्ज आहे. दरम्यान, भारताकडे घातक गोलंदाज बुमराह आहे, जो विशिष्ट प्रसंगी सर्वोत्तम गोलंदाजांनाही हादरवू सोडतो. तसेच भारताकडे आयसीसी रँकिंगमध्ये नंबर वन स्थानावर असलेला वरुण चक्रवर्ती आहे. जो अंतिम फेरीमध्ये त्याचे सर्वोत्तम देऊ शकतो.
भारतीय संघात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आहे. पंड्याची कामगिरी आतापर्यंत त्याच्या रँकिंगनुसार राहिलेली नाही हे खरे आहे, परंतु २३८ गुणांसह टी-२० रँकिंगमध्ये हार्दिकचे पहिल्या क्रमांकाचे स्थान हे क्षणभंगुर नाही. मोठ्या टप्प्याचा विचार केला तर हार्दिकच्या बॅट आणि बॉलचा अनुभव वेगळा असतो. त्याची बॅट प्रतिस्पर्ध्यांना स्फोटक स्ट्रोक देते आणि चेंडू स्टंपवर आदळल्यावर सारखाच आवाज येतो.
हेही वाचा : पाकिस्तानला धूळ चारण्यास भारताचे ‘हे’ खेळाडू सज्ज! एक तर आधीच करतोय कहर; वाचा सविस्तर
भारताचा टी २० रेकॉर्ड हा पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. २००७ मध्ये या फॉरमॅटची सुरवात करण्यात आली. या स्वरूपात पाकिस्तान संघाने जेव्हा जेव्हा भारतीय संघाचा सामना केला केला आहे तेव्हा भारताने त्यांना पराभव केला आहे. दोन्ही देशांमधील खेळल्या गेलेल्या १५ सामन्यांपैकी भारताने ११ सामने आपल्या खिशात घातले आहेत. तर पाकिस्तानला फक्त ३ सामने खिशात घालता आले आहेत. आहेत.