Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: LSG विरुद्धच्या सामन्यात धोनी करणार कमबॅक? समोर आली मोठी अपडेट

MS Dhoni Comeback In IPL: आयपीएल २०२६ मध्ये अद्याप एकही सामना न खेळलेला धोनी मैदानावर पुन्हा कधी दिसणार असा प्रश्न चाहत्यांना पडलेला असातानाच धोनीच्या कमबॅकबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 13, 2026 | 01:20 PM
photo- Social Media

photo- Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • LSG विरुद्धच्या सामन्यात धोनी करणार कमबॅक?
  • समोर आली मोठी अपडेट
  • प्लेऑफच्या रेसमध्ये चेन्नई मारणार बाजी?
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. परंतु, धोनीने IPL 2026 मध्ये अद्याप एकही सामना न खेळलेला नाही. त्यामुळे संघाचा माजी कर्णधार एम.एस. धोनी कधी खेळणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सध्या, धोनी दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यातच आता धोनीच्या कमबॅकबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात धोनी खेळताना दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे(M.S.Dhoni) एम.एस. धोनीची एक झलक पाहण्यासाठी आतुर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

IPL 2026: दिल्लीचा दणदणीत विजय पण अक्षर पटेलवर BCCI ची कारवाई; नेमकं कारण काय?

एस. एस धोनी करणार कमबॅक?

पोटरीच्या दुखापतीमुळे एम.एस. धोनी या आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामात मैदानाबाहेर होता. दुखापतीची तीव्रता पाहता, तो यावर्षी संघासोबत फार कमी प्रवास करू शकला आहे. आतापर्यंत तो फक्त हैदराबाद(SRH) आणि मुंबईविरुद्धच्या (MI) सामन्यांमध्येच संघासोबत दिसला आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी पुष्टी केली आहे की, धोनीचे तिकीट संघातील इतर ६० सदस्यांसह इंडिगोच्या कमर्शियल विमानाने लखनऊला जाण्यासाठी बुक करण्यात आले आहे. अंतिम निर्णय धोनीचा असला तरी, याबातमीने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्लेऑफच्या रेसमध्ये चेन्नई मारणार बाजी?

चेन्नई सुपर किंग्स सध्या गुणतालिकेत (Points Table) पाचव्या स्थानावर असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवांनी केल्यानंतर, पाच वेळच्या या विजेत्या संघाने आपल्या शेवटच्या आठ सामन्यांपैकी सहा सामने जिंकून दमदार कमबॅक केले आहे. संघाच्या या यशामागे संजू सॅमसनची स्फोटक फलंदाजी आणि युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजची भेदक गोलंदाजी कारणीभूत आहे. सीएसकेने(CSK) आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये ६ विजय आणि ५ पराभवांसह १२ गुण मिळवले आहेत. प्लेऑफमध्ये (Playoffs) स्थान मिळवण्यासाठी, त्यांना १६ गुणांचा टप्पा गाठावा लागेल. यासाठी उर्वरित तीन सामन्यांपैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. लीग टप्प्यातील शेवटच्या तीन सामन्यांपैकी किमान एका सामन्यात धोनी मैदानात उतरेल, अशी चाहत्यांना आशा आहे. चेन्नई सुपर किंग्सचे सामने १५ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स, १८ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि २१ मे रोजी गुजरात टायटन्स यांच्याविरुद्ध होणार आहेत.

कॅमेरा सुरू झाला की Virat Kohli बदलतो? भारताच्याच माजी खेळाडूने थेट सांगितले; म्हणाले…

Web Title: Ms dhoni comeback against csk vs lsg ipl 2026 match latest update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • cricket marathi news
  • IPL 2026
  • MS Dhoni Captain

संबंधित बातम्या

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’
1

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
2

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट
3

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…
4

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.