विराट कोहली (फोटो- ians)
विराट कोहलीबाबत संजय मांजरेकर यांचे भाष्य
आरसीबीकडून विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये
पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी पहिल्या स्थानावर
Virat Kohli In IPL 2026: आयपीएलचा महासंग्राम शेवटच्या टप्प्यात आला आहे. लवकरच प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. सध्या आरसीबीचा संघ आयपीएलमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. आरसीबीचा संघ चांगला खेळ करत आहे. त्यातून भारताचा सर्वोत्तम फलंदाज आणि आरसीबीचा खेळाडू विराट कोलही जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. आरसीबीकडून (IPL 2026) खेळताना, आपल्या उत्कृष्ट फलंदाजी, चपळ फिल्डिंग आणि मैदानावरील जबरदस्त ऊर्जेमुळे चर्चेत आहे. धावांचा पाऊस पाडण्यासोबतच मैदानावर प्रत्येक विकेटचे, क्षणाचा आनंद व्यक्त करणे ही त्याची ओळख आहे. मात्र आता यावर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी भाष्य केले आहे.
विराट कोहली त्याच्या खेळीसोबत जबरदस्त आक्रमकतेसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याच्या या अति-उत्साहावर आणि देहबोलीवर टीका केली जाते. ‘विराट कोहली केवळ कॅमेऱ्यासाठी नाटक करतो’, असा आरोप अनेकदा विरोधकांकडून केला जातो. यावर संजय मांजरेकर यांनी भाष्य केले आहे. यामुळे टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत.
विराट कोहलीचा मैदानावार दिसणारा आक्रमकपणा हा नवीन किंवा कोणताही दिखावा नाहीये. अनेक लोकांचा असा समज आहे की विराट केवळ समोर कॅमेरा बघून मुद्दाम असं वागतो, मात्र मी याच्याशी अजिबात सहमत नाहीये. मी त्याला सुरुवातीपासून ओळखतो. मी त्याला अंडर – 19 च्या संघाकडून खेळताना पाहिले आहे. तेव्हाही तो आक्रमकपणा दाखवायचा आणि आताही तो तसाच आहे. आक्रमकता त्याच्या क्रिकेट करिअरच्या सुरुवातीपासूनच त्याची खरी ओळख राहिली आहे, असे संजय मांजरेकर म्हणाले.
आरसीबीने मुंबईच्या तोंडचा घास हिरावला
IPL २०२६ चा ५४ वा सामना रविवारी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात, आरसीबी ने २ गडी राखून विजय मिळवला. हा सामना रायपूर येथे पार पडला, जिथे आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने १६६ धावांची एकूण धावसंख्या उभारली.
आरसीबीने डावाच्या अगदी शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले. कृणाल पांड्याने एक शानदार अर्धशतक झळकावले, तर भुवनेश्वर कुमारने सामन्याचा उत्कृष्ट शेवट केला. पाच वेळा विजेते ठरलेल्या मुंबई संघाचे IPL 2026 मधील प्ले-ऑफच्या शर्यतीतून आव्हान संपुष्टात आले आहे. ११ सामन्यांमध्ये त्यांना हा आठवा पराभव पत्करावा लागला असून, गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, तितक्याच सामन्यांमध्ये आपला सातवा विजय नोंदवत RCB संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी झेपावला आहे.






