Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: ‘थाला’ची एन्ट्री पुन्हा लांबली; धोनीशिवाय CSK चा अंतिम सामना; चाहत्यांची उत्सुकता कायम

चेन्नई सुपर किंग्जसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. चेन्नईच्या संघाचा माजी कर्णधार आणि वरिष्ठ खेळाडू महेंद्रसिंह धोनी आजच्या सामन्यात देखील खेळणार नसल्याचे समोर येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 21, 2026 | 04:48 PM
IPL 2026: ‘थाला’ची एन्ट्री पुन्हा लांबली; धोनीशिवाय CSK चा अंतिम सामना; चाहत्यांची उत्सुकता कायम
Follow Us
Follow Us:

अहमदाबादमध्ये चेन्नई अन् गुजरात आमनेसामने 
एम.एस. धोनी रांचीत आपल्या परतला 
प्ले ऑफमध्ये चेन्नईला आज विजय अनिवार्य

Tata IPL 2026 CSK Vs GT Live Updates: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या दृष्टीने आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. आजचा सामना चेन्नईने जिंकला तरी क्वालिफाय होण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र चेन्नईच्या संघासाठी एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे.

चेन्नई सुपर किंग्जसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. चेन्नईच्या संघाचा माजी कर्णधार आणि वरिष्ठ खेळाडू महेंद्रसिंह धोनी आजच्या सामन्यात देखील खेळणार नसल्याचे समोर येत आहे. तसेच दुखापतीच्या कारणांमुळे धोनी आपल्या घरी परतला असल्याचे समजते आहे. शेवटच्या सामन्याच्या आधी तो संघाच्या कॅम्पमधून बाहेर गेल्याचे समजते आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

एमएस धोनीच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो आजच्या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. चेन्नईच्या कोच यांनी ही माहिती दिल्याचे समजते आहे. मात्र आजचा सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने क्वालिफाय केले तर धोनी पुन्हा संघासोबत जोडला जाऊ शकतो. सध्या धोनी संघासोबत नाहीये, मात्र आम्ही क्वालिफाय झाल्यास तो पुन्हा जोडला जाईल असे चेन्नईच्या कोचने सांगितले.

CSK Vs GT Pitch Report: चेन्नई अन् गुजरात भिडणार; अहमदाबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? वाचा पिच रिपोर्ट

चेन्नई सुपर किंग्जला मागच्या सामन्यात होम ग्राऊंडवर एसआरएचकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा क्वालिफाय करण्याचा मार्ग खडतर झाला आहे. आजचा सामना त्यांना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. मोठ्या रनरेटने जिंकल्यास चेन्नईच्या आशा जिवंत राहणार आहेत. तसेच क्वालिफाय होण्यासाठी त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

चेन्नई अन् गुजरात भिडणार

आयपीएल २०२६ च्या ६६ व्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. हा महत्वाचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. प्लेऑफच्या दृष्टीने गुजरातसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते.

ट्रेंड की थट्टा? Dipak Chahar च्या ‘त्या’ कृतीने ‘चिठ्ठी’ सेलिब्रेशनची उडवली खिल्ली, पहा Viral Video

येथे चेंडू बॅटवर सहज येतो त्यामुळे मोठे फटके खेळणे सोपे होते. म्हणूनच या मैदानावर अनेकदा मोठी धावसंख्या पाहायला मिळते. सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी स्विंग आणि सीम मूव्हमेंट मिळू शकते. खेळपट्टी कोरडी राहिल्यास मधल्या ओव्हरमध्ये फिरकी गोलंदाजही प्रभावी ठरू शकतात. मात्र, जसजसा सामना पुढे जातो तसतशी खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक चांगली होत जाते. दुसरीकडे, रात्री दव पडल्यास गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

Web Title: Ms dhoni did not play against gt due to injury csk tata ipl 2026 updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2026
  • M.S. Dhoni

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.