Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Airport Record Passengers: मुंबई विमानतळाची ऐतिहासिक भरारी! नोव्हेंबर २०२५ मध्ये गाठला प्रवाशांचा विक्रमी टप्पा

मुंबई विमानतळाने नोव्हेंबर २०२५ मध्ये ४८.८८ लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा गाठला. २९ नोव्हेंबर रोजी १.७६ लाख प्रवाशांसह आतापर्यंतचा सर्वोच्च एका दिवसाचा उच्चांक प्रस्थापित झाला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 18, 2025 | 04:58 PM
मुंबई विमानतळाची ऐतिहासिक भरारी! (Photo Credit - X)

मुंबई विमानतळाची ऐतिहासिक भरारी! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुंबई विमानतळाची ऐतिहासिक भरारी!
  • नोव्हेंबरमध्ये ४८ लाखांहून अधिक प्रवाशांची विक्रमी नोंद
  • २९ नोव्हेंबर ठरला ‘सुपर संडे’
Mumbai Airport News Marathi: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (CSMIA)ने नोव्‍हेंबर २०२५ मध्‍ये उत्तम प्रवासी वाहतूक कामगिरीची नोंद केली, जेथे या महिन्‍यादरम्‍यान ४८.८८ लाखांहून अधिक प्रवाशी संख्या नोंदवली गेली. या उत्तम कामगिरीचे श्रेय सणासुदीचा काळ आणि हिवाळ्यामध्‍ये प्रवासासाठी वाढलेल्‍या मागणीला जाते, तसेच व्‍यापक देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय कनेक्‍टीव्‍हीटीचे पाठबळ देखील मिळाले.

एकाच दिवसातील विक्रमी कामगिरी

सीएसएमआयएने नोव्‍हेंबरमध्‍ये १५, २२ व २९ नोव्‍हेंबर २०२५ रोजी अव्‍वल तीन एका दिवसात प्रवासी वाहतूक रेकॉर्ड्स स्‍थापित केले आहेत, ज्‍यासह मागील विक्रमांना पार केले आहे. विमानतळाने २९ नोव्‍हेंबर २०२५ रोजी १.७६ लाख प्रवाशांसह आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च एका दिवसात प्रवासी आकारमानाची नोंद केली, ज्‍यामधून प्रवास विभागांमधील सतत विकास दिसून येतो.

तारीख प्रवासी संख्या विमानांची ये-जा (ATMs)
२९ नोव्हेंबर २०२५ १.७६ लाख (सर्वोच्च) १,०१९
२२ नोव्हेंबर २०२५ १.७२ लाख १,०२१
१५ नोव्हेंबर २०२५ १.७२ लाख १,०२६

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास

नोव्‍हेंबर २०२५ दरम्‍यान सीएसएमआयएने जवळपास २७,९६० एअर ट्रॅफिक मूव्‍हमेंट्स दर्शवली, जेथे ३.४ दशलक्षहून अधिक देशांतर्गत प्रवशांना विमान प्रवासाची सुविधा दिली, तसेच आंतरराष्‍ट्रीय मार्गांवर १.४ दशलक्षहून अधिक प्रवाशांना सुविधा दिली.

हे देखील वाचा: Mumbai Airport Customs Raid: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ३ दिवसांत अडीच किलो सोनं आणि ८ किलो ‘ड्रग्ज’ जप्त

कुठे होती सर्वात जास्त गर्दी?

आंतरराष्‍ट्रीय गंतव्‍यांमध्‍ये दुबई २,०९,७१४ प्रवाशांसह सर्वात वर्दळीचे गंतव्‍य ठरले, ज्‍यानंतर लंडन हीथ्रो (१,१२,०४३ प्रवासी) आणि अबु धाबी (१,००,२८४ प्रवासी) यांचा क्रमांक होता. देशांतर्गत गंतव्‍यांसंदर्भात दिल्‍ली ६,०९,६४६ प्रवाशांसह अव्‍वलस्‍थानी होते, ज्‍यानंतर बेंगळुरू (४,३६,३०१ प्रवासी) आणि चेन्‍नई (२,०७,६९२ प्रवासी) यांचा क्रमांक होता.

२९ नोव्‍हेंबर रोजी प्रवास केलेल्‍या एकूण १.७६ लाख प्रवाशांपैकी जवळपास १.२२ लाख देशांतर्गत प्रवासी होते, तर ५४,००० हून अधिक आंतरराष्‍ट्रीय प्रवासी होते. या टप्‍प्‍यापूर्वी सीएसएमआयएने २१ नोव्‍हेंबर २०२५ रोजी १,०३६ च्‍या आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च दैनंदिन एअर ट्रॅफिक मूव्‍हमेंट्सची नोंद केली, ज्‍यामधून गर्दीच्‍या प्रवास कालावधीदरम्‍यान विमानतळाची उत्तम ऑपरेशनल सुसज्‍जता दिसून येते.

२९ नोव्‍हेंबर रोजी सर्वोच्‍च प्रवासी आकारमान असलेले आंतरराष्‍ट्रीय गंतव्‍य होते दुबई (७,२०० प्रवासी), लंडन हीथ्रो (४,७६६ प्रवासी), अबु धाबी (३,२१३ प्रवासी), सिंगापूर (३,०५४ प्रवासी) आणि दोहा (२,३६९ प्रवासी). देशांतर्गत नेटवर्कमध्ये प्रमुख गंतव्‍य जसे दिल्‍ली (२२,७०३ प्रवासी), बेंगळुरू (११,५६५ प्रवासी), चेन्‍नई (७,५७८ प्रवासी), कोलकाता (६,६६७ प्रवासी) आणि हैदराबाद (६,५०७ प्रवासी) यांनी प्रबळ मागणीची नोंद केली.

उत्तम नियोजन आणि सुसज्जता

भारतातील सर्वात वर्दळीचे व सर्वोत्तम कनेक्‍टेड एअरपोर्ट्स असलेल्‍या सीएसएमआयएने वाढत्‍या प्रवासी आकारमानाची पूर्तता करणे सुरू ठेवले आहे, तसेच अधिक वाहतूक कालावधीदरम्‍यान सुलभ ऑपरेशन्‍सची खात्री घेत आहे. विमानतळाच्‍या नोव्‍हेंबर २०२५ मधील उत्तम कामगिरीमधून पसंतीचे देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय गेटवे म्‍हणून मुंबईचे स्‍थान अधिक दृढ झाले आहे, जे आगामी महिन्‍यांमध्‍ये वाढत्‍या प्रवास मागणीची पूर्तता करण्‍यासाठी उत्तमरित्‍या सज्‍ज आहे.

हे देखील वाचा: Mumbai Airport News:  ए. बी. डी. मास्ट्रोची मोठी घोषणा! सुपर-प्रीमियम पोर्टफोलिओ आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध

Web Title: Mumbai airports historic achievement a record number of passengers was reached in november 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • mumbai airport
  • passanger
  • Record

संबंधित बातम्या

Mumbai Airport Customs Raid: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ३ दिवसांत अडीच किलो सोनं आणि ८ किलो ‘ड्रग्ज’ जप्त
1

Mumbai Airport Customs Raid: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ३ दिवसांत अडीच किलो सोनं आणि ८ किलो ‘ड्रग्ज’ जप्त

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video
2

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.