दीपक चाहर (फोटो - ians)
राजस्थानने 11 ओव्हर्समध्ये एमआयच्या गोलंदाजांना धुतले
दीपक चाहरने पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या 22 धावा
मुंबईचा 27 धावांनी दणदणीत पराभव
Mumbai Indians Vs Rajasthan Royals: काल गुवाहाटीच्या बरसपारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना (Mi vs RR) पार पडला. पाऊस सुरू असल्याने सामना उशिरा सुरू झाला. तसेच नियमांनुसार 11 ओव्हर्सचा सामना खेळवला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव केला आहे. मात्र या सामन्यात मुंबईचा गोलंदाज दीपक चाहरने एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला.
11 ओव्हर्सच्या खेळामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने मुंबईच्या संघाला 151 धावांचे लक्ष्य दिले. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद खेळी केली. 11 ओव्हर्समध्ये या धावांचा पाठलाग करणे मुंबईच्या फलंदाजांना जमले नाही. मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव केला. मात्र यामध्ये दीपक चाहरने मुंबईसाठी एक नको तो विक्रम आपल्या नावावर केला आहे.
प्रथम गोलंदाजी करना मुंबईकडून दिपक चाहरने गोलंदाजी केली. वैभव आणि यशस्वीने दीपक चाहरच्या पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा लुटल्या. दीपक चाहरने मुंबई इंडियन्ससाठी सर्वात महागडी ओवर टाकली. तसेच त्याने ल्युक वूडचा रेकॉर्ड मोडला आहे. याआधी मुंबईसाठी सर्वात जास्त रन्स एका ओव्हरमध्ये देण्याचा रेकॉर्ड ल्युक वूडच्या नावावर होता. 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वूडने एका ओव्हरमध्ये 19 धावा दिल्या होत्या. मात्र आता हा रेकॉर्ड दीपक चाहरच्या नावावर झाला आहे.
MI Vs RR Live: ‘यशस्वी-वैभव’ची बॅट तळपली अन् मुंबईचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; पलटणचा दारुण पराभव
मुंबई पलटणचा दारुण पराभव
गुवाहाटी येथील बरसपारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. गुवाहाटीमध्ये पाऊस सुरू झाल्याने हा सामना 7.30 वाजण्याऐवजी 10 वाजता सुरू झाला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ लूइसनुसार हा सामना 11 ओव्हर्सचा खेळवला गेला. तसेच 3.2 ओव्हर्सचा पॉवर प्ले खेळवण्यात आला. दरम्यान राजस्थान रॉयल्सने 11 ओव्हर्समध्ये 150 धावा केल्या असून मुंबई इंडियन्सला 11 ओव्हर्समध्ये 151 धावांचे लक्ष्य दिले. अखेर आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव केला आहे.
DC Vs GT Pitch Report: मैदान तयार, खेळाडू सज्ज, पण…; पाऊस गेम करणार, पहा पीच रिपोर्ट
मुंबई इंडियन्सकडून पहिली ओव्हर दीपक चाहरने टाकली. त्याने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये तबल 22 धावा दिल्या. पॉवर प्लेची तिसरी ओव्हर ट्रेंट बोल्टने केली. चौथी ओव्हर कर्णधार हार्दिक पंड्याने टाकली. ए.एम. गझनफरने ध्रुव जुरेलची आणि कर्णधार रियान परागची विकेट घेतली. तर शार्दुल ठाकूरने वाईबाहव सूर्यवंशीची विकेट घेतली.






