तुर्भेसह विविध गावठाणांत तुळशी विवाह साजरा
आधुनिकतेच्या वाटेवर वेगाने धावणाऱ्या नवी मुंबईत विकासाचे नवे पर्व आकार घेत असताना, शहरातील मूळ गावठाणांनी मात्र आपल्या परंपरा आणि सांस्कृतिक वारशाची नाळ आजही घट्ट जपली आहे. बदलत्या शहरी जीवनशैलीतही धार्मिक रीतिरिवाज आणि सण-उत्सवांची परंपरा कायम असल्याचे चित्र शनिवार (ता. २१) रोजी नवी मुंबईतील विविध गावठाणांमध्ये पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या तुळशी विवाह सोहळ्यातून पाहायला मिळाले.
हिंदू धर्मपरंपरेत तुळशी विवाहाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कार्तिक शुक्ल द्वादशीला तुळशी विवाहाचा सोहळा मोठया थाटेने साजरा केला जातो हीरिक वृंदावनाची आकर्षक सजावट, फुलांची आरास, रांगोळ्या, दिव्यांची रोषणाई आणि मंगलमय वातावरणात तुळशी आणि भगवान श्रीविष्णूंचे प्रतीक असलेल्या शाळिग्रामाचा विवाह पारंपरिक विधीवत पद्धतीने पार पडला.
महिलांनी मंगलाष्टके, पारंपरिक विवाहगीते आणि विधींमध्ये उत्साहाने सहभाग घेतला, विशेष म्हणजे, नवी मुंबईसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात आधुनिक जीवनशैलीचा प्रभाव वाढत असतानाही गावठाणांमध्ये सण-उत्सव साजरे नव्या पिढीपर्यंत या प्रोमोकोलीयांनी नागरिक, महिला आणि कुटुंबीयांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे तुळशी विवाहासारखे धार्मिक सोहळे केवळ श्रद्धेपुरते मर्यादित न राहता सामाजिक एकोपा, कौटुंबिक जिव्हाळा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे माध्यम असल्याचे मुक्ता सुभाष सांगितले करण्याची जुनी पद्धत आजही कायम आहे.
नवी मुबईच्या विकासाचा प्रवास सुरू असताना येथील मूळ गावांची ओळखा, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक ठेवा जिवंत ठेवणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आधुनिकतेचा स्वीकार करतानाच आपल्या पूर्वजांनी दिलेल्या परंपरांचे जतन करणे, हीच या गावठाणांची खरी ओळख ठरत आहे. तुळशी विवाहाच्या निमिताने पुन्हा एकदा नवी मुंबईतील गावठाणांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवून दिले.
शैक्षणिक आणि सांस्कृतिक गाव म्हणून ओळख असलेल्या तुर्भे गावाने आपली पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक परंपरा आजही जपली आहे. याच परपरेचा प्रत्यय शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर रोजी तुर्भे गावातील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या तुलसी विवाह सोहळ्यात पाहायला मिळाला, हा विवाह सोहळ्ळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे भगवान श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करून पार पडलेल्या तुलसी विवाहात पारंपरिक विवाह सोहळ्याप्रमाणेच करवल्या, बैंडबाजा वाजवत आधी नवरदेवाला मंदिरापर्यंत आणले गेले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: नवी मुंबईतील तुर्भेसह विविध गावठाणांमध्ये तुळशी विवाह सोहळा साजरा करण्यात आला.
Ans: तुळशी विवाहाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या विवाहानंतर शुभकार्यांना सुरुवात करण्याची परंपरा आहे.
Ans: आधुनिकीकरणाच्या काळातही पारंपरिक संस्कृती, धार्मिक रीतिरिवाज आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश या सोहळ्यातून मिळतो.






