Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये घमासान! दिल्लीचा बॉस परतला; चेन्नईच्या ‘किंग्ज’ला पाणी पाजण्यासाठी झाला सज्ज

दिल्ली कॅपिटल्सचा इन फॉर्म वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याला एका सामन्यात कॅच पकडताना दुखापत झाली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: May 05, 2026 | 03:54 PM
IPL 2026 मध्ये घमासान! दिल्लीचा बॉस परतला; चेन्नईच्या ‘किंग्ज’ला पाणी पाजण्यासाठी झाला सज्ज
Follow Us
Close
Follow Us:

लुंगी एनगिडी झाला होता दुखापतग्रस्त 
चेन्नई आणि दिल्लीसाठी सामना महत्वाचा 
अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामना

Tata IPL 2026 DC Vs CSK Live Updates: आज आयपीएलचा 48 वा सामना खेळवला जाणार आहे. थरारक सामना सध्या चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. आज ऋतुराज गायकवाड आणि अक्षर पटेल आमनेसामने येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये मॅच होणार आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा इन फॉर्म वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आजच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याला एका सामन्यात कॅच पकडताना दुखापत झाली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात तो गोलंदाजी करताना दिसणार का हे पहावे लागणार आहे. आता त्यातच त्याच्याबाबत माहिती समोर आली आहे.

लुंगी एनगिडीबाबत कोच मुनाफ पटेलने भाष्य केले आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लुंगी एनगिडीने ‘कंकशन प्रोटोकॉल’ अंतर्गत असलेला आरामाचा कालावधी पूर्ण केला आहे. आता त्याला खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मागील सामन्यात दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता, ज्यामुळे दिल्लीच्या गोलंदाजीवर परिणाम झाला होता.

CSK Vs DC Pitch Report: आज घनघोर युद्ध होणार! चेन्नई अन् दिल्ली खेळणार, पहा आजचा पीच रिपोर्ट

पीच रिपोर्ट काय सांगतो?

अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. हे स्टेडियम थोडे लहान असल्याने मोठे फटके मारणे या ठिकाणी सोपे जाते. मात्र या पीचवर स्पिनर्सला देखील मदत मिळू शकते. दिल्लीत आज आकाश निरभ्र असून पावसाची शक्यता केवळ १०% इतकी आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

IPL 2026 मध्ये खळबळ! कॅपिटल्सविरुद्ध उद्या ‘थाला’ खेळणार? चाहत्यांची धाकधूक वाढली

आजच्या सामन्यात कर्णधार अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीवर मदार असणार आहे. फलंदाजीमध्ये केएल राहुल, पाथुम निसांका अत्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मात्र मिचेल स्टार्कची गोलंदाजी चेन्नईसाठी डोकेदुखी ठरू शकते. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे चेन्नईचे मुख्य खेळाडू आहेत. गेल्या सामन्यात संजू सॅमसनने दिल्लीविरुद्ध शतकी खेळी केली होती. तर अंशूल कंबोजने चेन्नईकडून 13 विकेट्स घेतल्या आहेत. सलामीवीर के. एल. राहुल तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने याच मैदानावर यंदा 152 रन्सची आक्रमक आणि विक्रमी खेळी केली होती. 433 रन्ससह तो ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईसाठी संजू सॅमसन हा सर्वात मोठा ‘मॅच विनर’ असणार आहे.

Web Title: Munaf patel said lungi nigdi played against delhi capitals tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Delhi Capitals
  • IPL 2026
  • Lungi Ngidi

संबंधित बातम्या

DC Vs PBKS Live: पंजाबच्या ‘किंग्ज’चा पराभवाचा ‘चौकार’; दिल्लीच्या विजयाने Play Off चे गणित बिघडले
1

DC Vs PBKS Live: पंजाबच्या ‘किंग्ज’चा पराभवाचा ‘चौकार’; दिल्लीच्या विजयाने Play Off चे गणित बिघडले

PBKS Vs DC Live: प्रियांशने रडवले तर Shreyas Iyer ने धू-धू धुतले, दिल्लीला 211 रन्सचे टार्गेट
2

PBKS Vs DC Live: प्रियांशने रडवले तर Shreyas Iyer ने धू-धू धुतले, दिल्लीला 211 रन्सचे टार्गेट

नुसता जाळ अन् धूर! Priyansh Arya ने लोळवलं; थंड हवेत दिल्लीच्या गोलंदाजांना फोडला घाम
3

नुसता जाळ अन् धूर! Priyansh Arya ने लोळवलं; थंड हवेत दिल्लीच्या गोलंदाजांना फोडला घाम

DC Vs PBKS Toss: आज नाही तर कधीच नाही; अक्षर पटेलने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय
4

DC Vs PBKS Toss: आज नाही तर कधीच नाही; अक्षर पटेलने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.