एम. एस. धोनी दिल्लीविरुद्ध खेळणार का? (फोटो- ians)
चेन्नई सुपर किंग्ज उद्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार
एमएस. धोनी संघासोबत दिल्लीला गेला नसल्याचे आले समोर
दुखापतीमुळे धोनी अद्याप खेळू शकला नाही एकही सामना
Tata IPL 2026 MS Dhoni Updates in CSK Team: आयपीएलचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहे. टॉप 4 साठी सर्व संघांची चुरस सुरू आहे. त्यातच आता 5 वेळेस विजेतपद पटकावलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ टॉप 4 मध्ये येण्यासाठी धडपड करत आहे. उद्या (IPL 2026) चेन्नई सुपर किंग्जचा संघ दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आपला सामना खेळणार आहे. दरम्यान या सामन्यात एम. एस. धोनी खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आयपीएलचा हंगाम शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचला आहे. ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीला मैदानात पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांची प्रतीक्षा आता अधिकच लांबण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आगामी महत्त्वाच्या सामन्यापूर्वी धोनी संघासोबत दिल्लीला गेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या महितीनुसार, महेंद्रसिंह धोनी गेल्या काही काळापासून दुखापतीमुळे संघाबहेर आहे. यामुळे तो अद्याप एकही सामना चेन्नईकडून खेळू शकलेला नाही. उद्या अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई आणि दिल्ली यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातून ‘थाला’ पुनरागमन करेल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, चेन्नईचा संघ दिल्लीला रवाना झाला असताना धोनी त्यांच्यासोबत विमानाने गेल्या नसल्याचे समोर आले आहे.
IPL 2026: सिक्सर किंग कोण? यंदाचा आयपीएल किंग ठरला ‘हा’ संघ, पहा संपूर्ण यादी
सिक्सर किंग कोण? यंदाचा आयपीएल किंग ठरला ‘हा’ संघ
यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक नवा रेकॉर्ड होताना पाहायला मिळत आहे. अनेक खेळाडू आपल्या नावावर अनेक विक्रम करत आहेत. चाहत्यांना रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. त्यातच आता यंदाच्या हंगामात अनेक संघांनी सर्वाधिक सिक्सर मारण्याचे रेकॉर्ड केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक सिक्सर मारण्याचा रेकॉर्ड कोणत्या संघाने केला आहे, ते जाणून घेऊयात.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याच्या शर्यतीत सनरायझर्स हैदराबादच्या संघाने बाजी मारली आहे. आयपीएल 2026 च्या 46 वा सामना होईपर्यंत, समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एसआरएचच्या फलंदाजांनी 118 सिक्स मारले आहेत. ‘पॉवर प्ले’ असो वा शेवटची षटके, हैदराबादचे फलंदाज फक्त मोठे फटके मारताना दिसून येत आहे.
IPL 2026: सिक्सर किंग कोण? यंदाचा आयपीएल किंग ठरला ‘हा’ संघ, पहा संपूर्ण यादी
पंजाब किंग्जच्या संघाने दुसरा नंबर पटकावला आहे. पंजाबच्या फलंदाजाने 9 सामन्यांमध्ये 108 सिक्स मारले आहेत. पंजाबची फलंदाजी यंदा अधिक आक्रमक दिसत आहे. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी 100 सिक्स मारण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. जस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी 37 षटकारांसह या यादीत अव्वल आहे.






