CSK Vs DC Pitch Report (फोटो- istockphoto)
महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही याकडे लक्ष
आयपीएलमध्ये चेन्नई अन् दिल्ली आमनेसामने
पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्याचा असणार प्रयत्न
Tata IPL 2026 CSK Vs DC Live Updates: आज दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. आयपीएलचा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. प्ले ऑफमध्ये (IPL 2026) जाण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.
आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघ सध्या पॉइंट टेबलमध्ये 8 पॉईंट्ससह 6 आणि 7 व्या स्थानी आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी अनिवार्य असणार आहे.
पीच रिपोर्ट काय सांगतो?
अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. हे स्टेडियम थोडे लहान असल्याने मोठे फटके मारणे या ठिकाणी सोपे जाते. मात्र या पीचवर स्पिनर्सला देखील मदत मिळू शकते. दिल्लीत आज आकाश निरभ्र असून पावसाची शक्यता केवळ १०% इतकी आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
आजच्या सामन्यात कर्णधार अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीवर मदार असणार आहे. फलंदाजीमध्ये केएल राहुल, पाथुम निसांका अत्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मात्र मिचेल स्टार्कची गोलंदाजी चेन्नईसाठी डोकेदुखी ठरू शकते. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे चेन्नईचे मुख्य खेळाडू आहेत. गेल्या सामन्यात संजू सॅमसनने दिल्लीविरुद्ध शतकी खेळी केली होती. तर अंशूल कंबोजने चेन्नईकडून 13 विकेट्स घेतल्या आहेत.
सलामीवीर के. एल. राहुल तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने याच मैदानावर यंदा 152 रन्सची आक्रमक आणि विक्रमी खेळी केली होती. 433 रन्ससह तो ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईसाठी संजू सॅमसन हा सर्वात मोठा ‘मॅच विनर’ असणार आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडने देखील सलग दोन अर्धशतके झळकावून आपला फॉर्म सिद्ध केला आहे.
IPL 2026 मध्ये खळबळ! कॅपिटल्सविरुद्ध उद्या ‘थाला’ खेळणार? चाहत्यांची धाकधूक वाढली
दिल्ली कॅपिटल्स: के. एल. राहुल (यष्टिरक्षक), पाथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी/काईल जेमिसन, कुलदीप यादव, टी. नटराजन
चेन्नई सुपर किंग्स: संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्वील पटेल, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग.






