Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Sports Awards : दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरचा राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मान; 17 खेळाडूंचा गौरव

National Sports Awards : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 प्रदान. दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 13, 2026 | 02:48 PM
National Sports Awards : दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरचा राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मान; 17 खेळाडूंचा गौरव

National Sports Awards : दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरचा राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मान; 17 खेळाडूंचा गौरव

Follow Us
Follow Us:
  • मराठमोळ्या दिव्याची ऐतिहासिक कामगिरी
  • प्रशिक्षकांचाही गुणगौरव
  • आर्मी पॅरालिम्पिक नोडलाही पुरस्कार
 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी (13 नोव्हेंबर) राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 चे (National Sports Awards) वितरण करण्यात आले. बुद्धिबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुख आणि डेकॅथलॉनपटू तेजस्विन शंकर यांच्यासह 17 खेळाडूंना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव), तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार आणि राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.

तेजस्विन शंकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्याला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले.

दुसरीकडे, बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने फिडे महिला विश्वचषक 2025 स्पर्धेचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला होता. हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. बाकू येथे झालेल्या अंतिम सामन्यात तिने भारताची अनुभवी बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीचा रॅपिड टायब्रेकरमध्ये 1.5-0.5 असा पराभव केला होता.

अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या अन्य खेळाडूंमध्ये ट्रॅक अँड फिल्डपटू मोहम्मद अजमल वरियाथोडी, रेस वॉकर प्रियंका गोस्वामी, बॉक्सर नरेंद्र, बुद्धिबळपटू विदित संतोष गुजराथी, पॅरा नेमबाज धनुष श्रीकांत, हॉकीपटू लालरेमसियामी हमारझोर्ट आणि राजकुमार पाल यांचा समावेश आहे. तसेच कबड्डीपटू सुरजीत आणि पूजा, पॅरा नेमबाज रुद्रांश खंडेलवाल, पॅरा अॅथलीट एकता भ्यान, रोअर अरविंद सिंह आणि नेमबाज अखिल श्योराण यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरम्यान, भारताची महिला बॅडमिंटन दुहेरीतील जोडी त्रिशा जॉली आणि पुलेला गायत्री गोपीचंद या जपान मास्टर्स स्पर्धेसाठी जपानमध्ये असल्याने पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत. अनुभवी भारतीय फुटबॉलपटू इसायाह अरुमाइनयागम यांना अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) प्रदान करण्यात आला.

प्रशिक्षकांचाही गुणगौरव

क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकांच्या योगदानाची दखल घेत अॅथलेटिक्स प्रशिक्षक परवीर सिंह, बॉक्सिंग प्रशिक्षक छोटे लाल यादव आणि धर्मेंद्र सिंह यादव, नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण आणि कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साहसी क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी बलजीत कौर आणि स्कलजांग रिग्झिन यांना लँड अॅडव्हेंचर प्रकारात, रिमो साहा यांना वॉटर अॅडव्हेंचर प्रकारात, तर शिव प्रसाद चमोली यांना जीवनगौरव श्रेणीत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला.

Sachin Tendulkar : स्वच्छ भारत मोहिमेला सचिनची साथ; कचरा व्यवस्थापनासाठी Recykal सोबत नवी भागीदारी

आर्मी पॅरालिम्पिक नोडला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

पुणे येथील आर्मी पॅरालिम्पिक नोडला राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराने गौरवण्यात आले. लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंह यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. क्रीडा क्षेत्राचा विकास आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था आणि संघटनांना हा पुरस्कार दिला जातो.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि योगदानाची दखल घेण्यासाठी प्रदान केले जातात. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींनुसार क्रीडा मंत्रालयाने १८ ऑगस्ट रोजी २०२५ च्या पुरस्कार विजेत्यांची अंतिम यादी जाहीर केली होती.

IND vs NZ: लाजच काढली! आधी फलंदाजांनी धुतलं मग गोलंदाजांनी रडवलं; Matt Henry च्या वादळात टीम इंडिया ८९ धावांत गारद

यंदा पुरस्कार वितरण सोहळ्याला एक वर्षाहून अधिक विलंब झाला. सामान्यतः हे पुरस्कार दिवंगत हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी प्रदान केले जातात. मात्र, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित होणाऱ्या वर्षांमध्ये या स्पर्धांच्या वेळापत्रकानुसार पुरस्कार वितरणाची तारीख निश्चित केली जाते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले?

    Ans: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले.

  • Que: दिव्या देशमुखला कोणता पुरस्कार मिळाला?

    Ans: बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • Que: द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला मिळाला?

    Ans: परवीर सिंह, छोटे लाल यादव, धर्मेंद्र सिंह यादव, नेहा नंदकुमार चव्हाण आणि वीरेंद्र कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: National sports awards 2025 sachin divya deshmukh arjuna award rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Divya Deshmukh
  • Droupadi Murmu
  • National Sports Day

संबंधित बातम्या

Droupadi Murmu : नागरिकांवर श्रेष्ठत्व नव्हे, सेवाभाव ठेवा! राष्ट्रपती मुर्मू यांचा आयपीएस अधिकाऱ्यांना कानमंत्र
1

Droupadi Murmu : नागरिकांवर श्रेष्ठत्व नव्हे, सेवाभाव ठेवा! राष्ट्रपती मुर्मू यांचा आयपीएस अधिकाऱ्यांना कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.