
पाकिस्तान क्रिकेर बोर्ड
पाकिस्तान शेवटच्या कसोटी सामन्याच्या आधी अनुभवी फलंदाज मोहम्मद रिझवान आणि सलामीवीर इमाम-उल-हक या दोन महत्वाच्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. मात्र केवळ खराब कामगिरी केल्यामुळे त्यांना परत बोलावले असल्याचे कारण नसून त्याच्यावर ड्रेसिंग रूममधील गुप्त माहिती लीक केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
ENG Vs PAK: बाबर आझमला इतिहासजमा करा! ४ वर्षे, ३९ डाव अन् झिरो सेंच्युरी, ‘फ्लॉप शो’ कायम
इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर रिझवान आणि इमाम यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या ‘नॅशनल सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ने (NCCIA) या दोन्ही खेळाडूंना ड्रेसिंग रूममधील गोपनीय माहिती आणि रणनीती बाहेर लीक केल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार या दोन्ही खेळाडूंना NCCIA समोर हजर राहून चौकशीला सामोरे जावे लागले आहे.
खेळाडूंचे कारकीर्द धोक्यात?
मालिकेतील लागोपाठच्या पराभवांमुळे पीसीबीने संपूर्ण दौऱ्याचा सखोल आढावा (रिव्ह्यू) घेण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला खराब फॉर्म आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू असलेली गंभीर चौकशी, यामुळे मोहम्मद रिझवान आणि इमाम-उल-हक या दोघांचेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द आता मोठ्या धोक्यात सापडली आहे.
Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…
ड्रेसिंग रूममधील रणनीती आणि त्यातून समोर आलेली माहिती बाहेर लीक केल्याचे आरोप रिजवान आणि इमाम उल हक यांच्यावर करण्यात आला आहे. तपास यंत्रणेने त्यांची तब्बल चार तास चौकशी केल्याचे समोर आले आहे. त्यातच त्यांचे फोन देखील तपास यंत्रणेने जप्त केल्याचे समजते आहे. या फोनमधून त्यांचा डेटा, चॅटस आणि कॉल रेकॉर्डसच सखोल तपासणी केली जाणार आहे.