सॅम आयूब शून्यावर आउट (फोटो- ians)
सुमारे 614 दिवसांच्या प्रदीर्घ काळाने कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या सैम अयुबकडून पाकिस्तानला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र मैदानात आल्यावर तो 10 बॉल सुद्धा धड खेळू शकला नाही. एकही रन न करता तो शून्यावर आउट झाला. कायम शून्यावर आउट होण्याच्या प्रयत्नामुळे तो आपल्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड करतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. सलामीला खेळण्यासाठी येऊन देखील तो पाकिस्तानला एक भक्कम सुरुवात देण्यास अपयशी ठरला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधील दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने धाडसी निर्णय घेत संघात तब्बल अर्ध्याहून अधिक खेळाडू बदलले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठे फेरबदल केले गेले. मात्र पाकिस्तानची अवस्था आहे तशीच राहिली आहे. सलामीची धुरा सांभाळणारा सैम अयुब आगामी सामन्यांमध्ये या खराब फॉर्ममधून बाहेर पडून स्वतःला सिद्ध करू शकतो की या नकोशा विक्रमाचा भाग बनतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ENG Vs PAK: अरे हे कसले क्रिकेटर! इतके बदल केले पण पाकड्यांचे टेक रडगाणे; केवळ 133 रन्स अन्…
सैम अयुबने यापूर्वी आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून डच्चू देण्यात आला होता. बर्मिंगहॅम कसोटीत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु सलामीला आलेल्या अयुबला १० बॉल खेळून देखील एकही रन करता आलेली नाही.
ENG Vs PAK: आधी लफडं करायचं अन् मग भोगायचं! तिसऱ्या टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महाभूकंप
पाकिस्तानची फलंदाजीची वाईट अवस्था झाल्याचे दिसून आले. पाचव्या स्थानावर कर्णधार बाबर आझम खेळण्यासाठी मैदानात उतरला. आज बाबर आझम चांगली खेळी करेल अशी अपेक्षित होते. मात्र तो देखील अपयशी ठरला. 18 बॉलमध्ये केवळ 7 रन्स करून तो आउट झाला. तो केवळ एक फोर मारू शकला. जोश टंगच्या बॉलवर बाबर आझम क्लीन बोल्ड झाला.






