इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान
पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि कर्णधार बाबर आझम सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान संघ व्यवस्थापनाची अवस्था ‘गिळताही येईना आणि ओकताही येईना’ अशी झाली आहे. संघातील बदलांनंतरही पाकिस्तानच्या फलंदाजीतील ढिसाळपणा कायम राहिला. या सर्व प्रकरणात सर्वात मोठी निराशा स्वतः बाबर आझमने केली आहे. या संपूर्ण मालिकेत त्याला अजूनही एकही मोठी खेळी साकारता आलेली नाही.
Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…
या सिरिजमध्ये बाबर आझमने एकाही डावात दोन अंकी किंवा त्यापेक्षा जास्त रन्स करता आलेल्या नाहीयेत. मात्र त्याच्या या सततच्या खराब फॉर्ममुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे बाबर आझमचे कर्णधारपद राहणार का हे पहावे लागणार आहे. सात मुख्य खेळाडूंना बदलूनही बाबर स्वतःच्या आणि संघाच्या कामगिरीत सुधारणा करू शकलेला नाही.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझमचा कसोटी क्रिकेटमधील खराब फॉर्म थांबण्याचे नाव घेत नाहीये. डिसेंबर २०२२ मध्ये कराची येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळताना बाबरने पहिल्या डावात १६१ धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता जवळजवळ चार वर्षांचा काळ उलटून गेला आहे, मात्र त्याच्या बॅटमधून एकही कसोटी शतक निघालेले नाही. बहुतांश डावांमध्ये तो स्वस्तात आउट होऊन तंबूत परतला आहे.
Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…
पाकिस्तानची फलंदाजीची वाईट अवस्था झाल्याचे दिसून आले. पाचव्या स्थानावर कर्णधार बाबर आझम खेळण्यासाठी मैदानात उतरला. बाबर आझम चांगली खेळी करेल अशी अपेक्षित होते. मात्र तो देखील अपयशी ठरला. 18 बॉलमध्ये केवळ 7 रन्स करून तो आउट झाला. तो केवळ एक फोर मारू शकला. जोश टंगच्या बॉलवर बाबर आझम क्लीन बोल्ड झाला.






