फोटो सौजन्य – X (BCCI)
Toss decision for India vs England third Test match : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा शुभारंभ झाला आहे. मालिकेमध्ये सध्या दोन सामन्यानंतर १–१ अशी बरोबरी आहे. भारताच्या संघाने दुसऱ्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर मालिकेत बरोबरी केली आहे. लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणाऱ्या या सामन्यामध्ये नाणेफेक पार पडले. या नाणेफेकमध्ये इंग्लडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघासमोर पहिले गोलंदाजीचे आव्हान असणार आहे.
भारतीय संघामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर हा चार वर्षानंतर कसोटी संघामध्ये पुनरागमन करत आहे. प्रसिद्ध कृष्णा याच्या जागेवर आज जसप्रीत बुमराह खेळणार आहे. भारताचा संघ पहिले गोलंदाजी करणार आहे. त्यामुळे आता पहिले भारताचे गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
इंग्लडच्या संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे, यामध्ये टंगला बाहेर करुन जोफ्रा आर्चरला संघामध्ये स्थान मिळाले आहे. भारताच्या संघाला नक्कीच चांगली सुरुवात करण्यासाठी पहिल्या सेशनपासुन विकेट्स घेणे गरजेचे आहे. भारताचे तीनही गोलंदाज आकाशदीप, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हे तिनही गोलंदाज दमदार फार्ममध्ये आहेत. भारतीय संघासाठी हा सामना फारच महत्वाचा असणार आहे, भारताच्या संघाने या सामन्यात विजय मिळवल्यास संघ मालिकेमध्ये आघाडी घेइल आणि त्यानंतर इंग्लडच्या संघावर पुढील सामन्यात दबाव निर्माण करु शकते.
वेडेपणा.. फक्त वेडेपणा…. वैभव सुर्यवंशीने जिंकलं गर्ल्स ‘फॅन्स’चे मन! दोन मुलींनी ओलांडल्या मर्यादा
पहिल्या सेशनमध्ये फलंदाजांना मदत मिळणार असे पिच रिपोर्टमध्ये दीप दास गुप्ता यांनी त्यानी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी हे ही सांगितले की फिरकी गोलंदाजांना देखील या पिचवर मदत मिळु शकते. दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवल्यानंतर टीम इंडीयाचा आत्मविश्वास वाढला असेल.
🚨 Toss and Team Update 🚨
England win the toss and elect to bat in the 3rd Test.
Jasprit Bumrah is back in the eleven 🙌
Updates ▶️ https://t.co/X4xIDiSmBg#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/uulWRWPOaU
— BCCI (@BCCI) July 10, 2025
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, आकाशदीप
बेन डकेट, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन आणि शोएब बशीर.