Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Its Show Time : नीरज गोयात विरुद्ध अँथनी पेटिस असा रंगणार ऐतिहासिक Boxing Match!

Boxing Match : भारतीय व्यावसायिक बॉक्सिंगपटू नीरज गोयात आणि माजी UFC लाईटवेट विश्वविजेता अँथनी पेटिस यांच्यात २३ जानेवारी २०२७ रोजी बॉक्सिंगचा थरार (Boxing Match) रंगणार आहे. सहा फेऱ्यांची ही सुपर वेल्टरवेट लढत भारतात आयोजित केली जाणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 15, 2026 | 07:15 PM
Its Show Time : नीरज गोयात विरुद्ध अँथनी पेटिस असा रंगणार ऐतिहासिक Boxing Match!

Its Show Time : नीरज गोयात विरुद्ध अँथनी पेटिस असा रंगणार ऐतिहासिक Boxing Match!

Follow Us
Follow Us:
  • हैदराबाद, विशाखापट्टणम की चेन्नई ?
  • नोव्हेंबरमध्ये अंतिम शहराची घोषणा
  • बॉक्सिंगचा थरार पाहण्याची संधी
 

भारतीय व्यावसायिक बॉक्सिंगपटू नीरज गोयात आणि माजी UFC लाईटवेट विश्वविजेता अँथनी पेटिस यांच्यात २३ जानेवारी २०२७ रोजी बॉक्सिंगचा थरार (Boxing Match) रंगणार आहे. ‘गोयात विरुद्ध पेटिस : द इंडियन अपरायझिंग’ असे या लढतीचे नाव असून, सहा फेऱ्यांची ही सुपर वेल्टरवेट लढत भारतात आयोजित केली जाणार आहे.
या ऐतिहासिक लढतीचे यजमानपद मिळवण्यासाठी हैदराबाद, विशाखापट्टणम आणि चेन्नई या शहरांमध्ये चुरस आहे. अंतिम शहर आणि सामन्याचे ठिकाण नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.

‘मोस्ट व्हॅल्युएबल प्रमोशन्स’ (MVP) या संस्थेशी करारबद्ध असलेला नीरज गोयात हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केलेला भारतीय बॉक्सर आहे. हरियाणातील 34 वर्षीय गोयातने गेल्या दशकभरात भारतीय व्यावसायिक बॉक्सिंगला जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जागतिक बॉक्सिंग परिषदेकडून (WBC) रँकिंग मिळवणारा तो पहिला भारतीय बॉक्सर असून, त्याने यापूर्वी WBC आशिया विजेतेपदही पटकावले आहे.

2024 मध्ये MVP सोबत करार करणारा गोयात पहिला आंतरराष्ट्रीय फायटर ठरला. त्याच वर्षी जेक पॉल विरुद्ध माइक टायसन यांच्या मुख्य लढतीच्या कार्यक्रमात त्याने ब्राझीलच्या विंडरसन न्युनेसचा पराभव केला होता. आता भारतातच एका मोठ्या आंतरराष्ट्रीय नावाविरुद्ध रिंगणात उतरण्याची संधी त्याला मिळणार आहे.

हा सामना भारताचा असेल – नीरज गोयात

आपल्या आगामी लढतीबाबत गोयात म्हणाला की, त्याने चीन, थायलंड, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सामने खेळले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी तो दुसऱ्या आयोजकाच्या कार्यक्रमातील भारतीय खेळाडू होता. आता भारतात स्वतःच्या देशातील प्रेक्षकांसमोर मोठ्या लढतीत उतरण्याची संधी मिळत असल्याचा आनंद त्याने व्यक्त केला.

अँथनी पेटिस हा अनुभवी आणि प्रतिष्ठित खेळाडू असल्याचे सांगत गोयातने त्याच्या कारकिर्दीचा आदर केला. मात्र, आपल्या देशातील प्रेक्षकांसमोर अशा मोठ्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लढण्यासाठी आपण दीर्घकाळ वाट पाहत असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

अँथनी पेटिसचीही भारतात लढण्याची तयारी

अमेरिकेतील मिलवॉकी येथील अँथनी पेटिसने 2010 मध्ये WEC लाईटवेट विजेतेपद आणि 2013 मध्ये UFC लाईटवेट विश्वविजेतेपद पटकावले. त्याने UFC मध्ये बेन्सन हेंडरसनला पराभूत करून विश्वविजेतेपद जिंकले होते. जानेवारी 2007 मध्ये व्यावसायिक कारकीर्द सुरू केलेल्या पेटिससाठी ही लढत कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

पेटिसने भारतीय बॉक्सिंग आणि मिक्स्ड मार्शल आर्ट्स क्षेत्रातील वाढत्या संधींचे कौतुक केले. नीरज गोयात हा भारतीय फायटर्समधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असल्याचे सांगत त्याच्याविरुद्ध लढण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.

या लढतीचे संपूर्ण कार्ड, थेट प्रक्षेपणाची माहिती आणि तिकिटांचा तपशील नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे बॉक्सिंगप्रेमींचे लक्ष आता यजमान शहराच्या घोषणेकडे लागले आहे.

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: नीरज गोयात आणि अँथनी पेटिस यांच्यातील बॉक्सिंग सामना कधी होणार आहे?

    Ans: या दोघांमधील सहा फेऱ्यांची बॉक्सिंग लढत २३ जानेवारी २०२७ रोजी होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.

  • Que: अँथनी पेटिस कोण आहे?

    Ans: अँथनी ‘शोटाइम’ पेटिस हा अमेरिकेचा माजी UFC लाईटवेट विश्वविजेता आहे. त्याने २०१३ मध्ये UFC चे लाईटवेट विजेतेपद पटकावले होते.

  • Que: नीरज गोयात कोणत्या वजनी गटात लढणार आहे?

    Ans: नीरज गोयात आणि अँथनी पेटिस यांच्यातील सामना सुपर वेल्टरवेट म्हणजेच १५४ पौंड वजनी गटात होणार आहे.

Web Title: Neeraj goyat vs anthony pettis boxing match india january 2027 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Boxing
  • chennai

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.