फोटो सौजन्य - ANI
टीम इंडिया : भारताचा संघ २७ जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. यासाठी भारताचा संघ आज श्रीलंकेला रवाना झाला आहे. टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि नवा स्टाफसोबत भारताचा संघ T२० मालिकेपासून सुरु करणार आहे. त्याचबरोबर १८ जुलै रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती, यावेळी अनेक मोठे बदल पाहायला मिळाले. त्याचबरोबर कोचिंग स्टाफ सुद्धा पूर्णपणे नवा आहे. आता टीम इंडिया नव्याने सुरुवात करणार आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये भारताचे बरेच खेळाडू विमानतळावर दिसत आहेत.
#WATCH | Mumbai | Indian Men’s Cricket Team arrives at the Airport, they’ll leave for Sri Lanka, shortly.
Indian Cricket Team will play the ODI and T20I series, 3 matches each, against Sri Lanka, starting on July 27 and ending on August 7. pic.twitter.com/ZmBmBqLasH
— ANI (@ANI) July 22, 2024
भारताचा असिस्टंट कोच अभिषेक नायर सुद्धा श्रीलंका दौऱ्यामध्ये असणार आहे. अभिषेक नायर आणि हार्दिक पांड्या दोघेही विमानतळावर स्पॉट झाले. T२० मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. एकदिवसीय सामन्याची कमान रोहित शर्माकडेच असणार आहे. त्याचबरोबर रियान परागला सुद्धा संघामध्ये स्थान देण्यात आले आहे.
भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडकर्ता अजित आगरकर यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मोठे खुलासे करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांनी सूर्यकुमार यादववर विश्वास दाखवला आहे.
क्रमांक | तारीख | सामने | स्थळ | वेळ |
1 | २७ जुलै २०२४ | भारत विरुद्ध श्रीलंका | पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | 19:00 |
2 | २८ जुलै २०२४ | भारत विरुद्ध श्रीलंका | पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | 19:00 |
3 | ३० जुलै २०२४ | भारत विरुद्ध श्रीलंका | पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | 19:00 |
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे,अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई.