
मिशेल सँटनर कसोटीतून बाहेर
मिशेल सँटनर संपूर्ण टेस्ट सिरीजमधून बाहेर
19 नोव्हेंबरपासून सुरू होणार पहिली कसोटी
भारताचे नेतृत्व शुभमन गिल करणार
IND Vs NZ: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 आणि वनडे सिरीज पार पडली आहे. आता लवकरच 19 नोव्हेंबर महिन्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. शुभमन गिल भारताचे नेतृत्व करणार आहे. ही टेस्ट सिरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळवली जाणार आहे. मात्र सिरीज सुरू होण्याच्या आधीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा ऑल राऊंडर खेळाडू संघाबाहेर गेला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या आगामी २ सामन्यांच्या टेस्ट सिरीजआधी न्यूझीलंड संघाला एक मोठा धक्का बसला आहे. किवी संघाचा अनुभवी खेळाडू कर्णधार मिचेल सँटनर उजव्या हाताच्या फ्रॅक्चरमुळे संपूर्ण कसोटी सिरीजमधून बाहेर झाला आहे. सराव सामन्यादरम्यान मिचेल सँटनरच्या उजव्या हाताच्या हाडाला फ्रॅक्चर झाले आहे.वैद्यकीय तपासणीनंतर त्याला काही आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून, तो भारता विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये खेळू शकणार नाही. हा न्यूझीलंड संघासाठी एक मोठा धक्का समजला जात आहे.
मिचेल सँटनरच्या जागी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने युवा अष्टपैलू खेळाडू डीन फॉक्सक्रॉफ्ट याची संघात निवड केली आहे. फॉक्सक्रॉफ्ट आपल्या अष्टपैलू खेळासाठी आणि देशांतर्गत क्रिकेटमधील दर्जेदार कामगिरीसाठी ओळखला जातो. त्यामुळे आता या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी फॉक्सक्रॉफ्टला उपलब्ध झाली आहे.
शेवटच्या सामन्यात भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंह याचा वेगवान बॉल सँटनरच्या बोटाला लागला होता. बॉल लागून हातावर गंभीर दुखापत झाली असतानाही सँटनरने माघार घेतली नाही. धाडस दाखवत त्याने मैदानातच थांबण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी सुरूच ठेवली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की, मिचेल सँटनरच्या उजव्या हाताच्या फ्रॅक्चरवर सध्या वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. सँटनरच्या पुनरागमनाबाबत बोलताना बोर्डाने सांगितले की, आगामी डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ४ सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये मिचेल सँटनर खेळू शकणार का, याबाबतचा अंतिम निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल.
दुसरा कसोटी सामना: क्राइस्टचर्च
Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 19 नोव्हेंबरपासून टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे.
Ans: मिचेल सँटनरच्या उजव्या हाताच्या हाडाला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर त्याला काही आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.