आयकर विभागात आहे Yuzvendra Chahal ऑफिसर (फोटो सौजन्य-X)
Yuzvendra Chahal Marathi : भारताचा चतुर चालाख लेग-स्पिनर युझवेंद्र चहल सध्या प्रचंड चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात दुरावा आला असून ते विभक्त होणार असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. दोघे विभक्त होणार असल्याचा दावा करणारे रिपोर्ट देखील अनेक माध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहेत. यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या चर्चा समोर आल्या होत्या तेव्हा चहलने पुढे येऊन या चर्चा निव्वळ अफवा आहेत असे म्हणत चर्चांचे खंडन केले होते. परंतु यावेळी दोघांनी या चर्चांना पाणी घातल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे युजवेंद्र चहल हा टीम इंडियाच्या सर्वोत्तम लेग-स्पिनर गोलंदाजांपैकी एक मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की, क्रिकेट खेळण्यासोबतच युजवेंद्र चहल सरकारी नोकरीही करतो.
युजवेंद्र चहलने आपल्या चमकदार कामगिरीने क्रिकेट जगतात आपली खास ओळख निर्माण केली आहे. एवढेच नाही तर क्रिकेटर होण्यासोबतच तो सरकारी नोकरीही करत आहे.युजवेंद्र चहल हा पहिला भारतीय खेळाडू आहे ज्याने बुद्धिबळ आणि क्रिकेट या दोन्ही खेळांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.त्याने जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे बुद्धिबळात प्रतिनिधित्व केले. तसेच त्याला बुद्धिबळामधे पुढे जाण्यासाठी प्रायोजकांच्या कमतरतेचा सामना करावा लागला, त्यामुळे त्याने क्रिकेटला आपले करिअर म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
चहलने २००९ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि लवकरच आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. T२०I क्रिकेटमध्ये सहा विकेट घेणारा तो पहिला भारतीय आणि दुसरा खेळाडू ठरला. चहलची क्रिकेट कारकीर्द अगदी आयपीएलच्या मैदानातही चमकदार राहिली आहे. सुरुवातीला तो मुंबई इंडियन्सकडून खेळला, पण त्याचा खरा जलवा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि नंतर राजस्थान रॉयल्समध्ये पाहायला मिळाला.
सध्या, चहल राजस्थान रॉयल्स संघाचा एक भाग आहे आणि त्याने आपल्या लेग स्पिनने संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. युझवेंद्र चहलने क्रिकेटमध्ये यशाची शिखरे गाठतानाच सरकारी सेवेतही योगदान दिले. चहलची २०१८ मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सरकारी क्षेत्रात मानाची नोकरी समजल्या जाणाऱ्या क्रीडा विभागात भारतीय आयकर विभागात त्यांनी नोकरी मिळवली आहे.
युझवेंद्र चहल आयकर विभागात उच्च पदावर सरकारी नोकरीवर काम करतात, ज्यामध्ये चहलला चांगला पगारही मिळतो. खुद्द युजवेंद्र चहलने त्याच्या नोकरीबद्दल खुलासा केला होता. चहल हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. क्रीडा कोट्याअंतर्गत ही नोकरी मिळाली आहे. अनेक खेळाडूंना त्यांच्या क्रीडा प्रवासासोबतच सरकारी सेवांमध्ये योगदान देण्याची संधी मिळाली आहे. युझवेंद्र चहलने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते की, त्याने आपल्या कामासाठी खूप मेहनत घेतली आहे.
स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत मिळालेल्या या नोकरीने त्याचे आयुष्य स्थिरावले. यासोबतच त्याने असेही सांगितले की, त्याला त्याची क्रिकेट कारकीर्द आणि ही नोकरी यामध्ये संतुलन राखावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार युजवेंद्र चहल यांना इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून 4,600 रुपये ग्रेड पे प्रमाणे वेतन मिळणार आहे. मात्र, युझवेंद्र चहलने आपल्या पगाराचा खुलासा केला नाही. इन्कम टॅक्समध्ये, इन्स्पेक्टरला 4,600 रुपयांच्या ग्रेड पेनुसार दरमहा 44,900 ते 1,42,400 रुपये पगार मिळतो.