NZ vs PAK 2nd T20: New Zealand beats Pakistan again; wins second T20 match..
NZ vs PAK 2nd T20 : पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था दिवसेंदिवस अतिशय खालावत चालली आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असलेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान संघाला साखळी सामन्यात आपल्या गाशा गुंडाळाव्या लागलया होत्या. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत शानदार विजय मिळवला आहे.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना 17 मार्च रोजी खेळवण्यात आला. जो पावसामुळे 15 षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात देखील पाकिस्तानला दारूण पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे या मालिकेत पाकिस्तानी संघ आता 0-2 ने पिछाडीवर पडला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. टीम सेफर्टने पाकिस्तानची स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीला चांगलेच जेरीस आणले. त्याने आफ्रिदीला एकाच षटकात 4 षटकार ठोकले लगावले. या सामन्यात टीम सेफर्टने केवळ 22 चेंडूत 45 धावा चोपल्या. त्याच्याशिवाय फिन ऍलनने देखील १६ चेंडूंत ३८ धावांची तडाखेबंद खेळी साकारली.
दुसरा टी-२० सामना पावसामुळे उशिरा सुरू करण्यात आला. सामन्यातील षटके कमी केल्यानंतर हा सामना १५ षटकांचा करण्यात आला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकांत 9 गडी गमावून 135 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून कर्णधार सलमान आगाने 28 चेंडूत ४६ धावा केल्या. इतर फलंदाजांना मात्र आपली छाप पाडता आली नाही.
हेही वाचा : क्रिकेटप्रेमी हादरले! उष्णतेच्या झळा जिवावर बेतल्या, पाकिस्तानी क्रिकेटरचा मैदानातच करूण अंत…
New Zealand go 2-0 up in the five-match T20I series with a victory in Dunedin 🙌
Scores 👉 https://t.co/YZlHlsigHk pic.twitter.com/u9JiOpYP9i
— ICC (@ICC) March 18, 2025
पाकिस्तानने दिलेल्या 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडने केवळ 13 षटकांमध्ये 137 धावा करत 5 विकेट राखून विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे न्यूझीलंड संघाने पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तानचा 61 चेंडूत आणि दुसऱ्या सामन्यात 79 चेंडूत पराभव केला होता.