Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ vs PAK, T20 World Cup : पाक आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार पहिला सुपर 8 सामना! खेळपट्टीसह हवामान कसे असेल? वाचा सविस्तर 

टी-२० विश्वचषक २०२६ मधील आठ संघांमधील सुपर ८ फेरीचा थरार २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार होणार आहे. या सुपर ८ मधील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 20, 2026 | 07:49 PM
NZ vs PAK, T20 World Cup: The first Super 8 match will be played between Pakistan and New Zealand! What will the weather be like along with the pitch? Read in detail

NZ vs PAK, T20 World Cup: The first Super 8 match will be played between Pakistan and New Zealand! What will the weather be like along with the pitch? Read in detail

Follow Us
Follow Us:

New Zealand vs Pakistan, Super 8, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ च्या गट टप्प्यातील सामने आज, २० फेब्रुवारी रोजी संपणार आहेत. त्यानंतर, आठ संघांमधील सुपर ८ फेरीचा थरार सुरू होणार होणार आहे.  सुपर ८ फेरीतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होईल. हा सामना शनिवारी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडने चार गट टप्प्यातील सामन्यांमध्ये तीन विजय आणि एक पराभवासह सुपर ८ टप्प्यात एंट्री केली आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026: ‘माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद…’, चार वर्षांनंतर अफगाणिस्तान क्रिकेटला अलविदा म्हणताना जोनाथन ट्रॉट भावुक

पाकिस्तानसाठी, साहिबजादा फरहानने आतापर्यंत फलंदाजीने चांगली छाप पाडली आहे. फरहानने चार सामन्यांमध्ये १६४ च्या स्ट्राईक रेटने २२० धावा फटकवल्या आहेत.  त्याने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात शतक झळकवले. तथापि, पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय असा आहे की, फरहानशिवाय संघातील इतर फलंदाजांना आतापर्यंत स्पर्धेत प्रभावी कामगिरी करण्यात यश आले नाही.

पाकिस्तानच्या या खेळाडूंवर असेल लक्ष्य

न्यूझीलंडविरुद्ध सॅम अयुब, बाबर आझम आणि कर्णधार सलमान आगा यांच्याकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. जर पाकिस्तान संघाला न्यूझीलंडच्या मजबूत गोलंदाजीविरुद्ध चांगली कामगिरी करायची असेल तर संघाच्या (टी-२० विश्वचषक २०२६)फलंदाजांना अधिक जबाबदारीने खेळावे लागणार आहे. पहिल्या फेरीत शादाब खानने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये आपली छाप पाडली होती. दरम्यान, उस्मान तारिकने विकेट घेणे आणि किफायतशीर कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केले आहे. तसेच या सामन्यातही पाकिस्तान अधिक फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवू शकतो कारण हा  निर्णय पाकिस्तानच्या बाजूने काम करत आहे.

न्यूझीलंडची या खेळाडूंवर असेल मदार

दुसरीकडे, न्यूझीलंडने गट टप्प्यात शानदार कामगिरी बाजवली आहे. या संघात टिम सेफर्ट धावा काढणारा फलंदाज आहे आणि स्पर्धेत संघाचा आघाडीचा धावा काढणारा खेळाडू म्हणून चांगली कामगिरी केली आहे. सेफर्टने चार सामन्यांमध्ये १७३ धावा केल्या आहेत. तर ग्लेन फिलिप्सनेही कॅनडाविरुद्ध ३६ चेंडूत ७६ धावा करत फॉर्ममध्ये परतल्याचे दाखवून दिले आहे. गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर, मॅट हेन्री आणि जेकब डफी यांच्या जोडीने सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. आर. प्रेमादासा स्टेडियमवर मिचेल सँटनर पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी अडचणीचा ठरू शकतो.

प्रेमादासा खेळपट्टी अहवाल

कोलंबो येथील आर. प्रेमदासा खेळपट्टी साधारणपणे मंद प्रकृतीची असते. फिरकीपटूंना या खेळपट्टीवरून बरीच मदत मिळत आली आहे. तसेच, चेंडू बॅटवर येण्यास अडचण येते. म्हणूनच कोलंबोच्या या मैदानावर जास्त धावसंख्या करणे कठीण होऊन बसते. या मैदानावर सरासरी पहिल्या डावात १४४ धावा आहेत, तर सरासरी दुसऱ्या डावात १२९ धावांचा रेकॉर्ड आहे.

हेही वाचा : चालू क्रिकेट सामन्यात मधमाश्यांचा हल्ला! जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न फेल, पंचाचा मैदानातच करूण अंत

सामन्यात पावसाचा अंदाज

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यावर पावसाच्या धोक्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान मैदानावर काळे ढग येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची शक्यता अंदाजे ७५ टक्के आहे.

हेड-टू-हेड रेकॉर्ड

पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण ४९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेवळवण्यात आले आहेत.यामध्ये पाकिस्तानने २४ सामने आपल्या नावावर केले तर  न्यूझीलंडने २३ सामन्यात विजय मिळवला. यामुळे दोन्ही संघांमधील सुपर ८ सामना चांगलाच रोमांचक होण्याची शक्यता आहे.

Web Title: Nz vs pak t20 world cup first super 8 match to be played between pakistan and new zealand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • NZ vs PAK
  • Sahibzada Farhan
  • T20 World Cup 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.