Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khashaba Jadhav Book : ऑलिम्पिकवीर खाशाबांच्या चरित्रातून मल्लांना प्रेरणा; संजय दुधाणे यांचे प्रतिपादन

Khashaba Jadhav Book : कोल्हापूरमधील मुरगुड येथे कुस्तीगीरांना ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा’ चरित्र पुस्तक भेट देण्यात आले. खाशाबांचे वारसदार मुरगुडमधून चमकतील, असा विश्वास लेखक संजय दुधाणे यांनी व्यक्त केला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 23, 2026 | 09:33 PM
Khashaba Jadhav Book : ऑलिम्पिकवीर खाशाबांच्या चरित्रातून मल्लांना प्रेरणा; संजय दुधाणे यांचे प्रतिपादन

Khashaba Jadhav Book : ऑलिम्पिकवीर खाशाबांच्या चरित्रातून मल्लांना प्रेरणा; संजय दुधाणे यांचे प्रतिपादन

Follow Us
Follow Us:
  • आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीगीरांचा सन्मान
  • मानसिक कणखरता आणि सकारात्मकता महत्त्वाची
  • दुर्मिळ छायाचित्रांसह १६६ पानांचे चरित्र
 

भारतीय कुस्तीला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पहिले कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची माहिती नव्या पिढीतील मल्लांना मिळावी, या उद्देशाने लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलातील कुस्तीगीरांना ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा’ या चरित्र पुस्तकाची भेट (Khashaba Jadhav Book) देण्यात आली. या वेळी, खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला कुस्तीत ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही. आता खाशाबांचे वारसदार मुरगुडमधून चमकतील, असा विश्वास पुस्तकाचे लेखक संजय दुधाणे यांनी व्यक्त केला.

मुरगुड येथे झालेल्या कार्यक्रमात जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या अमृता पुजारी हिच्यासह तालमीतील सात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीगीरांचा संजय दुधाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले, माजी नगरसेवक राहुल शिंदे, दीपक शिंदे, राजेंद्र कांबळे, नगरसेवक दत्तात्रय मंडलिक, माजी प्राचार्य महादेव कानकेकर, प्रकाश तिराळे, दयानंद खतकर आणि राजेंद्र मकोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

मानसिक कणखरता आणि सकारात्मकता महत्त्वाची

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय दुधाणे यांनी खाशाबा जाधव यांच्या पदकविजयाच्या कामगिरीला उजाळा दिला. त्यानंतर त्यांनी पदकविजेत्या महिला कुस्तीपटू अमृता पुजारी, नंदिनी साळुंखे, स्वाती शिंदे आणि तन्वी मगदूम यांच्याशी संवाद साधला.

खेळात यश मिळवण्यासाठी शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक कणखरता आणि सकारात्मकताही तितकीच महत्त्वाची असते. प्रत्येक खेळाडू आणि प्रशिक्षकाने हे पैलू लक्षात ठेवावेत, असा सल्ला दुधाणे यांनी दिला. कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे यांनीही खाशाबा जाधव यांच्या चरित्राचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ खेळाडूच नव्हे, तर जीवनात संघर्ष करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी खाशाबांचे जीवनचरित्र प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

IND W vs ZIM W: श्री चरणीच्या ‘जादुई’ फिरकीनंतर, प्रतीका रावलचे खणखणीत शतक; टीम इंडियाचा झिम्बाब्वेला दणका

दुर्मिळ छायाचित्रांसह १६६ पानांचे चरित्र

‘ऑलिम्पिकवीर खाशाबा’ या पुस्तकात खाशाबा जाधव यांची दुर्मिळ छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. 166 पानांच्या या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक दिवंगत य. दि. फडके यांनी प्रस्तावना लिहिली आहे. प्रा. संजय दुधाणे यांनी सखोल संशोधन करून खाशाबांचा जीवनप्रवास शब्दबद्ध केला आहे.

महाराष्ट्रातील नामवंत तालमींमधील खेळाडूंना हे पुस्तक भेट देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूर, पुणे, कराड आणि सातारा येथील खेळाडूंनाही या उपक्रमांतर्गत पुस्तक भेट देण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक दादासो लवटे यांनी केले. बटू जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर स्वाती शिंदे यांनी आभार मानले.

Asian Para Games : सुमित अंतिलचा भालाफेकीत ‘गोल्डन’ थ्रो! भारताची पदकांची विक्रमी शंभरी पार

Web Title: Olympic khashaba jadhav book presented to wrestlers murgud kolhapur rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • international news
  • kolhapur
  • Wrestler

संबंधित बातम्या

Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?
1

Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?

Satara News: ‘तो’ आघात सहन झाला नाही! मित्राच्या विरहाने ग्रासलेल्या पूजाने वसतिगृहात संपवली जीवनयात्रा
2

Satara News: ‘तो’ आघात सहन झाला नाही! मित्राच्या विरहाने ग्रासलेल्या पूजाने वसतिगृहात संपवली जीवनयात्रा

तिबेटमध्ये महाविनाश! ७.० रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने हादरली धरणी; रात्रीच्या वेळेत ३०० घरे उद्ध्वस्त, १६ ठार तर ३२ जखमी
3

तिबेटमध्ये महाविनाश! ७.० रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने हादरली धरणी; रात्रीच्या वेळेत ३०० घरे उद्ध्वस्त, १६ ठार तर ३२ जखमी

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: नवी मुंबई – ऐरोलीतील विबग्योर शाळेला धमकी,  विबग्योर शाळेच्या मेल आयडीवर धमकी
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: नवी मुंबई – ऐरोलीतील विबग्योर शाळेला धमकी, विबग्योर शाळेच्या मेल आयडीवर धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.