फोटो सौजन्य – X (ICC)
ICC Women’s World Cup 2025 : 30 सप्टेंबरपासून महिला एकदिवसीय विश्वचषकाचा शुभारंभ होणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट चाहते फारच उत्सुक आहेत. 2025 महिला एक दिवसीय विश्वचषकाचे आयोजन हे भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची सुरुवात ही भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यापासून होणार आहे. भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाची तयारी आता सुरू झाली आहे.
आयसीसीचे अध्यक्ष जय शहा आणि आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांच्यासह भारतीय क्रिकेटचा वर्तमानात आणि भूतकाळामध्ये यांच्या पॅनल चर्चेपूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला भारताचा माजी खेळाडू युवराज सिंह त्याचबरोबर भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज, स्मृती मानधना आणि भारताची आताची कर्णधार हरमनप्रीत कौर हे खेळाडू देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
RCB चा वेगवान गोलंदाज यश दयालवर UP T20 League मध्ये बंदी! खेळाडूचं करिअर धोक्यात
भारताच्या संघाने याआधी 1978, 1997 आणि 2013 मध्ये महिला विश्वचषक स्पर्धांचे आयोजन केले होते. आयसीसी चे अध्यक्ष जय शाह हे या कार्यक्रमांमध्ये म्हणाले की 2025 मध्ये भारतात होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचे पुनरागमन महिला खेळांसाठी एका निर्णायक क्षणी होत आहे. जागतिक दर्जाचा स्पर्धेची सुरुवात लवकरच होणार आहे या खेळाची जागतिक प्रतिष्ठान आणखी उंचावेल असे जय शहा यांनी सांगितले.
तारिख | सामना | ठिकाण |
---|---|---|
30 सप्टेंबर 2025 | भारत विरुद्ध श्रीलंका | बंगळुरू |
1 ऑक्टोंबर 2025 | ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड | इंदोर |
2 ऑक्टोंबर 2025 | बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान | कोलंबो |
3 ऑक्टोंबर 2025 | इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका | बंगळुरू |
4 ऑक्टोंबर | ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका | कोलंबो |
5 ऑक्टोंबर | भारत विरुद्ध पाकिस्तान | कोलंबो |
6 ऑक्टोंबर | न्युझीलँड विरुद्ध साऊथ आफ्रिका | इंदोर |
7 ऑक्टोंबर | इंग्लंड विरुद्ध बांगलादेश | गुवाहाटी |
8 ऑक्टोंबर | ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान | कोलंबो |
9 ऑक्टोंबर | इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका | विशाखापट्टणम |
10 ऑक्टोंबर | न्युझीलँड विरुद्ध बांगलादेश | गुवाहाटी |
11 ऑक्टोंबर | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका | कोलंबो |
12 ऑक्टोंबर | इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया | विशाखापट्टणम |
13 ऑक्टोंबर | साऊथ आफ्रिका विरुद्ध बांगलादेश | विशाखापट्टणम |
14 ऑक्टोंबर | न्युझीलँड विरुद्ध श्रीलंका | कोलंबो |
15 ऑक्टोंबर | इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान | कोलंबो |
16 ऑक्टोंबर | ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश | विशाखापट्टणम |
17 ऑक्टोंबर | साऊथ आफ्रिका विरुद्ध श्रीलंका | कोलंबो |
18 ऑक्टोंबर | न्युझीलँड विरुद्ध पाकिस्तान | कोलंबो |
19 ऑक्टोंबर | इंडिया विरुद्ध इंग्लंड | इंदोर |
20 ऑक्टोंबर | श्रीलंका विरुद्ध बांगलादेश | कोलंबो |
21 ऑक्टोंबर | साऊथ आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान | कोलंबो |
22 ऑक्टोंबर | ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड | इंदोर |
23 ऑक्टोंबर | इंडिया विरुद्ध न्यूझीलंड | गुवाहाटी |
24 ऑक्टोंबर | पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका | कोलंबो |
25 ऑक्टोंबर | ऑस्ट्रेलिया विरुद्ध साउथ आफ्रिका | इंदोर |
26 ऑक्टोंबर | इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड | कोलंबो |
26 ऑक्टोंबर | इंडिया विरुद्ध बांगलादेश | बंगळुरु |
29 ऑक्टोंबर | सेमीफायनल 1 | कोलंबो/गुवाहाटी |
30 ऑक्टोंबर | सेमीफायनल 2 | बंगळुरु |
2 नोव्हेबर | फायनल | बंगळुरु/कोलंबो |