मुंबई: क्रिकेट हा अनपेक्षित खेळ आहे, क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल याचा काही नेम नाहीय. क्रिकेटमध्ये दररोज कोणता ना कोणता विक्रम घडत असतो. पण विजय हजारे ट्रॉफीमध्ये एक वेगळाच विक्रम घडला असून, यामुळं अभूतपूर्व असा रेकॉर्ड होत इतिहास घडला आहे. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत उत्तरप्रदेश विरुद्ध महाराष्ट्र या सामन्यात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने ऐतिहासिका खेळी साकारताना फक्त 159 चेंडूत शानदार दुहेरी शतक ठोकले. तसेच यावेळी ऋतुराज गायकवाडने (Rituraj Gaikwad) एका आगळ्यावेगळ्या विक्रमला गवसणी घातली.
[read_also content=”मोठी बातमी! राज्यपालांनी पदमुक्त होण्याची व्यक्त केली इच्छा https://www.navarashtra.com/maharashtra/the-governor-my-be-resigned-of-his-post-due-to-chhatrapati-shivaji-maharaj-statement-349123.html”]
दरम्यान, अहमदाबाद येथे 50 षटकांच्या विजय हजारे स्पर्धेत उत्तर प्रदेश विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळताना ऋतुराज गायकवाडने चक्क एका षटकात सात षटकार ठोकले आहेत, असा पराक्रम करणार ऋतुराज गायकवाड हा पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यात गोलंदाज शिवा सिंगने टाकलेल्या डावाच्या 49व्या षटकात पहिल्या चार चेंडूवर ऋतुराजने चार षटकार मारले.
शिवा सिंगने पाचवा चेंडू नो-बॉल टाकला, ज्यावर ऋतुराजने सिक्स मारला. फ्री हिटवर मिळालेल्या चेंडूवर सहावा षटकार मारला. आणि षटकातील शेवटच्या चेंडूवरही ऋतुराजने सिक्स मारला. अशाप्रकारे एकाच षटकात सात षटकार ठोकून ऋतुराजने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. तसेच याच षटकात ऋतुराजने 43 धावा कुटल्या. क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वांधिक 43 धावा हि घटना पहिल्यांदाच घडली आहे.