Pahalgam Attack: 'This inhuman cruelty is unimaginable..', Indian cricket world expresses condolences over Pahalgam attack...
Pahalgam Attack : देशात आयपीएल 2025 चा थरार रंगला असताना दुसरीकडे, जम्मू आणि काश्मीरमध्ये एक वाईट घटना घडली. ज्याने संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. मंगळवारी(22 एप्रिल) अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील जवळच्या बैसरन गवताळ प्रदेशात झालेल्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. तर २० हून अधिक लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. २०१९ च्या पुलवामा बॉम्बस्फोटानंतर हा हल्ला नागरिकांवरील सर्वात घातक हल्ला असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्याचा सर्वच क्षेत्रातून निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. अशातच भारतीय क्रिकेट विश्वातून देखील या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे.
या हल्ल्यात भारतातील विविध राज्यांसह नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातीतील पर्यटकांचा देखील समावेश होता. कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश व्यतिरिक्त, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातीतील दोन परदेशी नागरिकांचाही या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : MI vs SRH : आज SRH पुढे फॉर्ममध्ये असलेल्या MI चे आव्हान, अभिषेक आणि हेडवर असेल लक्ष्य..
या वेदनादायक हल्ल्यानंतर देशभरातून लोक शोक व्यक्त करता आहेत. अनेक प्रमुख भारतीय क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाद्वारे या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच भारतीय क्रिकेट सांगहकडून देखील शोक व्यक्त करण्यात आला आहे.
Heartbreaking to hear about the attack in Pahalgam. My prayers are with the victims and their families. Violence like this has no place in our country.
— Shubman Gill (@ShubmanGill) April 22, 2025
संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने ट्विटरवर लिहिले आहे की, पहलगाममधील हल्ल्याबद्दल ऐकून मन दुखावले आहे. माझ्या प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. अशा प्रकारच्या हिंसाचाराला आपल्या देशात कोणतेही स्थान नाही.
तसेच भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक केएल राहुल याने ट्विट करत म्हटले आहे की, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल ऐकून मन खूप दुःखी झाले असून पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझी संवेदना. मी शांती आणि धैर्यासाठी प्रार्थना करतो.
Praying for the families of the deceased. Those responsible for this will pay. India will strike. #Pahalgam
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 22, 2025
Heartbreaking to hear about the terrorist attack in Kashmir. My thoughts are with the families of the victims. Praying for peace and strength. 🙏
— K L Rahul (@klrahul) April 22, 2025
हेही वाचा : मॅच फिक्सिंगच्या बाबतीत नवा ट्विस्ट! BCCI चा राजस्थान रॉयल्सला पूर्ण पाठिंबा, वाचा संपूर्ण प्रकरण
माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने देखील या हल्ल्याबद्दल ट्विटरवर लिहिले आहे की, पहलगाममधील ही अमानुष क्रूरता अकल्पनीय आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना. ओम शांती. आशा आहे की गुन्हेगार आणि त्यांच्या समर्थकांना लवकरच शोधले जाईल आणि त्यांना पकडले जाईल, त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, ज्यासाठी ते पात्र असतील.
Unimaginable atrocity in Pahalgam.
Heart goes out to the victims and their families. 🕉️ शान्ति।
Hope the perpetrators (and their sympathisers) are identified, caught and given the punishment they deserve.— Aakash Chopra (@cricketaakash) April 22, 2025
या घटनेमुळे आपल्याला एक खोलवरचे सत्य जाणवते की, खेळ आणि उत्सव हे आपल्या जीवनाचा एक भाग असू शकतात, परंतु जीवनाचे मूल्य, त्याची प्रतिष्ठा आणि मानवता त्यांच्यापेक्षा खूप जास्त वर आहे. काश्मीरमध्ये वारंवार होत असलेला हिंसाचार केवळ तेथील रहिवाशांच्या सुरक्षिततेला आणि शांततेला गंभीर धोका निर्माण करत नसून तो संपूर्ण राष्ट्राच्या विवेकाला देखील धक्कादायक इशारा देता आहे. दे