फोटो सौजन्य - Rajasthan Royals
राजस्थान रॉयल्स : काल आयपीएल २०२५ चे ४० सामने पूर्ण झाले आहेत. या कालच्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने विजय मिळवून १२ गुण मिळवले आहेत. सध्या इंडियन प्रीमियर लीगचा हा १८ वा सिझन फारच मनोरंजक होत चालला आहे. या सीझनमध्ये अनेक रेकॉर्ड मोडले आहेत त्याचबरोबर या सीझनमध्ये या ४० सामन्यांमध्ये प्रेक्षकांना सुपर ओव्हरचा सामना देखील पाहायला मिळाला होता. आता सध्या राजस्थान रॉयल्सचा संघ चर्चेत आहे. संघाने या सीझनमध्ये फार काही चांगली कामगिरी केली नाही पण सध्या राजस्थान रॉयल्सचा संघ मॅच फिक्सिंगमुळे मोठया प्रमाणात चर्चेत आहे आज आम्ही तुम्हाला या संदर्भात नवीन अपडेट या लेखामध्ये देणार आहोत.
राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर, संघावर मॅच फिक्सिंगचा आरोप झाला. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (RCA) तदर्थ समितीचे निमंत्रक जयदीप बिहाणी यांनी संघावर हा आरोप केला आहे. तथापि, त्यांच्यावरील मॅच फिक्सिंगच्या आरोपांनंतर, राजस्थानने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यावर आक्षेप घेतला. पण आता एका अहवालात असे म्हटले आहे की आरसीएचे आरोप तिकीट विक्रीमुळे असू शकतात.
‘टाईम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, आयपीएल २०२५ दरम्यान आरसीएला नेहमीपेक्षा कमी तिकिटे मिळाली आहेत, जी त्यांच्या नाराजीचे खरे कारण असू शकते. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की राजस्थान रॉयल्सकडून आरसीएला साधारणपणे प्रत्येक सामन्यासाठी सुमारे १,८०० तिकिटे दिली जात होती, परंतु २०२५ मध्ये ही संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली, जिथे त्यांना प्रति सामन्यासाठी फक्त १,०००-१,२०० तिकिटे देण्यात आली.
🚨 FALSE ALLEGATIONS VS RR. 🚨
A BCCI official said, “the BCCI has an anti-corruption unit working 24×7 to keep the bad elements away from the game. There is no truth to these allegations of match fixing by RCA”. (TOI). pic.twitter.com/cFdjALqQZx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 22, 2025
सूत्रांच्या अहवालानुसार, राजस्थानच्या एका आतल्या सूत्राने सांगितले की, ‘सीझनच्या सुरुवातीलाच भारतीय नियामक मंडळाने आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की राजस्थान क्रिकेट असोसिएशन विसर्जित झाल्यामुळे, आम्ही सर्व व्यवस्थांसाठी राजस्थान राज्य क्रीडा परिषदेशी संपर्क साधू असे सांगण्यात आले होते.’ राजस्थान रॉयल्सने बिहानी यांनी केलेले आरोप आधीच फेटाळून लावले आहेत आणि आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानेही आरसीएविरुद्ध आवाज उठवल्याचे वृत्त समोर आले आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आरसीए सध्या विसर्जित झाले आहे. एक तदर्थ समिती स्थापन करण्यात आली आहे आणि निवडणुका जवळ येत असताना बरेच नाट्य घडत आहे. प्रत्येकाला स्वतःकडे लक्ष वेधायचे असते. बीसीसीआयकडे भ्रष्टाचार विरोधी पथक आहे जे वाईट घटकांना खेळापासून दूर ठेवण्यासाठी अहोरात्र काम करते. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही.