नेदरलँड्सने नामिबियाला 7 विकेट्सने चारली धूळ(फोटो-सोशल मीडिया)
NAM vs NED, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज मंगळवारी १० वा सामना नामिबिया आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात, अष्टपैलू बास डी लीडेच्या शानदार कामगिरीमुळे नेदरलँड्सने नामिबियाला सात विकेट्सने धूळ चारली.
हेही वाचा : भारतीय क्रीडा जगात शोककळा! आंतरराष्ट्रीय शूटर संभाजी पाटील यांचे कार अपघातात निधन
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि नामिबियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाची सुरुवात खराब झाली. लॉरेन स्टीनकॅम्प १० धावांवर ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर निकोल लॉफ्टी-ईटन आणि जान फ्रायलिंक यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. जान फ्रायलिंक ३० धावांवर माघारी गेला. नामिबियाचा दुसरी विकेट ६० धावांवर परळी.
गेर्हार्ड इरास्मस आणि निकोल लॉफ्टी-ईटन यांच्यातील भागीदारी आकार घेत असताना गेरहार्ड इरास्मस १८ धावांवर माघारी गेला. तिसरा संघाची तिसरी विकेट्स ९५ धावांवर पडला. निकोल लॉफ्टी-ईटन ४२ धावा काढून बाद झाला. त्यानंतर जेजे स्मित २२ धावांवर माघारी गेला. नामिबियाने २० षटकांत ८ गडी गमावून १५६ धावा केल्या. नेदरलँड्सकडून बास डी लीडे आणि लोगान व्हॅन बीक यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर आर्यन दत्त आणि फ्रेड क्लासेन यांनी प्रत्येकी १ बळी घेण्यात यश आले.
नेदरलँड्ससमोर विजयासाठी १५७ धावांचे लक्ष्य उभे करण्यात आले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना संघाची सुरुवात मात्र खराब झाली आणि संघाच्या १६ धावांवर मॅक्स ओ’डॉड ७ धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला बास डी लीडेने शानदार फलंदाजी करत ४८ चेंडूत नाबाद ७२ धावा फटकावल्या. या खेळीत त्याने चार षटकार आणि पाच चौकार लगावले. ज्यामुळे १२ चेंडू शिल्लक असताना नेदरलँड्सने ७ गडी राखून विजय मिळवला.
हेही वाचा : IND vs PAK : पाकिस्तानच्या यु-टर्नवर वसीम जाफरने उडवली खिल्ली! आतापर्यत कोणीही पाकचा असा अपमान केला नाही…
डी लीडेने मायकेल लेविट (२८) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ६८, दुसऱ्या विकेटसाठी ३० आणि तिसऱ्या विकेटसाठी कॉलिन अॅकरमन (३२) सोबत ३२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. लीडेने कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (नाबाद १८) सोबत ४३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी देखील रचली. नेदरलँड्सने १८ षटकांतच ३ बाद १५९ धावा करून सामना आपल्या खिशात घातला.बास डी लीडेच्या बॅटमधून विजयी चौकार आला. उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीबद्दल बास डी लीडेला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.






